भाज्यांना भाव नसल्याने शेतकरी हवालदिल

लक्ष्मण डुबे 
गुरुवार, 5 एप्रिल 2018

रसायनी (रायगड) - पनवेल येथे घाऊक बाजारात ऊन्हाळी भेंडी आणि इतर भाज्यांचे भाव गडगडले आहे. त्यामुळे रसायनी परीसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. भेंडीला किलोला दहा बारा रुपये भाव मिळत असल्याने वाहतुक आणि हमालीचा खर्च सुटत नाही. आशी तक्रार शेतक-यांनी मांडली आहे. 

परीसरातील मोहोपाडा, चावणे, आपटे, वडगाव या पंचक्रोशितील सिंचनाचा आधार असणारे शेतकरी ऊन्हाळ्यात दर वर्षी भेंडी, दुधी, काकडी, कारली, घोसाळी, शिरोळी, गवार व मिरची असे भाजीपाल्याचे मळे लावतात. जास्तीत जास्त शेतकरी भेंडीचे आणि त्यापाठोपाठ इतर भाज्यांचे पिक घेत आहे. पनवेल येथील बाजारात भेंडीला दहा ते बारा रुपये, दुधी व लाल भोपळा चार रुपये, टोमॅटो आठ रुपये, काकडी तीस रुपये, वांगी शिरोळी व घोसाळी वीस रूपये, हिरवी मिरची व गवार पन्नास रुपये किलोला भाव मिळत आहे. असे सांगण्यात आले. तर बियाणे, औषध, खते, मजुरी, यांच्या दरात वाढ होत आहे. मात्र मालाला भाव मिळत नाही त्यामुळे तोटा होत आहे असे कुरंगळे, मुंढे या शेतक-यांनी सांगितले. 

यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला त्यामुळे देशा वरील भाज्यांची बाजारात आवक चांगली आहे, तसेच मळे लागवडीचे क्षेत्रफळ वाढत आहे. परिणामी भाज्यांचे उत्पादन वाढले. त्यामुळे स्थानीक शेतक-यांच्या भाज्यांना भाव कमी मिळत असल्याचे जाणकार शेतकरी यांनी  सांगितले. मोहोपाडा बाजार पेठेत भाज्यांना बरा भाव मिळतो मात्र पाटीभर भाजी विकण्यासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागते. सायंकाळ पर्यंत खपली नाही तर कमी भावाने भाज्या विकुन जावे लागते असे सांगण्यात आले.

Web Title: Farmers havoc because vegetables have no prices