पाली खोपोली राष्ट्रीय महामार्ग सुरक्षिततेसाठी उपोषण

pali
pali

पाली - पाली खोपोली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच (एमएसआरडीसी) पुर्णतः जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी केला आहे. या मार्गाच्या सुरक्षितेतेकरीता व एम.एस.आर.डी.सी. च्या गलथान कारभाराच्या विरोधात सोमवारी (ता.१८) महामार्गालगत असलेल्या घोड्याचा डोह गावाजवळ आमरण उपोषणास बसणार आहे. याबाबचे लता कळंबे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.

पाली खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ (अ) या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. परिणामी हा मार्ग वाहतुक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक व जिवघेणा झाला आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी किरण पानबुडे यांनी स्विकारले. निवेदनात नमुद केले आहे की हे आमरण उपोषण कोणत्याही एका गावासाठी किंवा केवळ एका तालुक्यासाठी नसून याचा प्रामाणिक उद्देश समाजहित व लोकसेवा हा आहे. या आंदोलनाला कोणताही राजकीय संदर्भ नाही. या महामार्गावर होणारी अवजड व ओव्हरलोड वाहतुक व वाहनांची वर्दळ जिवघेणी ठरत असून अपघाताला निमंत्रण देत आहे. रस्ता रुंदिकरणादरम्यान ठिकठिकाणी रस्ता फोडून काम केले जात आहे. हे काम करीत असताना सबंधीत ठेकेदाराकडून रस्ता सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असून याकडे एम.एस.आर.डीचे सोईस्कर व जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत आहे. असे नमद केले आहे.

धोकदायक रस्ता...
याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महांडळाच्या(एम.एस.आर.डी.सी) अखत्यारित सोपवण्यात आला आहे. या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे, दगडगोटे आदी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशी नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या नादुरस्त रस्त्यामुळे अपघाती घटनांचे प्रमाण देखील वाढत आहे. एम.एस.आर.डी.सी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून अपघाताच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसते. रस्त्यावर वापरण्यात येणारे जे.सी.बी व अन्य साहित्याचा वापर करतांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न बाळगता काम केले जात असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मातीचे डोंगर फोडून काम सुरु असल्याने मार्गावर पुर्णपणे चिखल साचून वाहने घसरुन अपघात होत आहेत. तसेच रस्त्यालगत काम सुरु असल्याचे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही सुचनाफलक अथवा दुभाजक लावण्यात आलेले नाहीत. तर एका बाजूचा रस्ता उंचवट्यावर तर नव्याने बनविला जाणारा रस्ता १० ते २० फूट खोदला असल्याने वेगवान वाहने रस्त्यावरुन खाली पडून आत्ता पर्यंत घडलेल्या अपघात आजवर अनेकांनी प्राण गमावले आहे. पावसाळ्यात या अपघाती घटनांत वाढ होऊन अनेक जिवांचे बळी जाणार असल्याची दाट भिती आहे. त्यामुळे निष्पाप जिवांचे प्राण वाचविण्यासाठी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळंबे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com