रात्री दहानंतर फटाके, वाद्यांना बंदी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

सावंतवाडी - न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्याविरोधात आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी फटाके, वाद्य, स्पीकर लावणे आता गुन्हा ठरणार आहे. 

सावंतवाडी - न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्याविरोधात आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी फटाके, वाद्य, स्पीकर लावणे आता गुन्हा ठरणार आहे. 

याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती येथील पोलिसांकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे. या गुन्ह्यात तत्काळ जामीन मिळणार नसून हा खटला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे चालणार आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा 1986 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतुदींचे सक्त पालन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फटाके, वाद्य वाजविण्यास सक्त बंदी करण्यात आली आहे. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वाजविण्यास मर्यादा ठेवण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता पोलिस घेणार आहेत. उल्लंघन झाल्यास पर्यावरण कायद्यानुसार पाच वर्षे कैदेची किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच हा गुन्हा चालू ठेवल्यास पुढील प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद ठेवण्यात आली आहे. शिक्षा झाल्यानंतर एक वर्षाच्या काळात पुन्हा गुन्हा घडल्यास सात वर्षांपर्यत शिक्षा होऊ शकते. 

विशेष म्हणजे या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल झाल्यास तो दखलपात्र तसेच अजामीनपात्र ठरणार आहे. तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे चालविण्यात येणार आहे. तसेच न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई होऊ शकते. 

Web Title: fireworks, instruments ban After ten clock