टेमघर नाल्यात मासे मृत्युमुखी

Fish died in temghar drain at temghar mahad
Fish died in temghar drain at temghar mahad

महाड - महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे सांडपाणी येथील टेमघर नाल्यात मिसळल्याने हा नाला प्रदुषित झाला असुन मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले आहेत. आज सकाळी ही घटना निदर्शनास आली. यापूर्वीही जून महिन्यात पहिल्या पावसाळ्यात हा नाला अशाच प्रकारे प्रदुषीत झाल्याने संतप्त जमावाने रास्ता रोको केले होते तरी ही एमआयडिसी व प्रदुषण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण,आग व वायू गळतींने असुरक्षितता निर्माण झालेली आहे. औद्योगिक क्षेत्रामधून टेमघर नाला वाहतो व या नाल्याकिनारी अनेक कारखाने आहेत. पावसाळ्यात काही कारखाने आपले सांडपाणी थेट नाल्यात सोडत असतात. यावर एमआयडिसी व प्रदुषण नियंत्रण मंडळाचा अंकूश राहिलेला नाही. टेमघर नाला पुन्हा अशाच प्रकारे प्रदुषित झाल्याने या नाल्यातील हजारो मासे पाण्यात मरुन पडले आहेत. यामुळे येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अशाच प्रकारे यापूर्वीही नाला प्रदुषित झाल्याने जमावेने एकत्रित येत एमआयडिसी मुख्य रस्त्यावरील टेमघर नाल्यावरील पूलावर वाहने अडवून रास्ता रोको केला होता या सर्वांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले परंतु नाल्यात राजरोज प्रदुषण करणाऱ्यांवर मात्र कारवाई होतांना दिसत नाही. या घटनेनंतर एमआयडिसी व प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com