'पीपल्स'च्या पाच जणांवर अपहारप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

महाड : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सव्वादोन कोटींचा अपहार करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी "पीपल्स एज्युकेशन सोसायटी'चे अध्यक्ष, माजी प्राचार्य यांच्यासह पाच जणांवर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला होता. कोणतेही अधिकार नसताना संस्थेचे पदाधिकारी व प्राचार्य असल्याचे भासवून या पाच जणांनी हा अपहार केल्याची डॉ. गुरव यांची तक्रार आहे.

मार्च 2014 पासून आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली करून त्याचा हिशेब व नोंद न ठेवता या पाच जणांनी दोन कोटी 28 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. याबाबतचे सर्व पुरावे नष्ट केल्याचीही तक्रार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार संस्थेचे कथित अध्यक्ष एम. एस. मोरे, माजी प्राचार्य सुरेश आठवले, प्रयोगशाळा सहायक विलास सोनावणे, भगवान इंगोले व नितीन गमरे या पाच जणांवर अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स