रायगड - पालीत गरीब रूगणांची मोफत तपासणी व उपचार

अमित गवळे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पाली (रायगड) : येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व सुरज हॉस्पिटल सानपाडा आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. येथील भक्त निवास क्रमांक दोन मध्ये हे आरोग्य शिबीर भरविण्यात आले होते. शिबिरात जवळपास 300 गरीब व गरजू रुग्णांवर मोफत आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप व व्यापारी मनोज मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थानचे विश्वस्त विनय मराठे , सचिन (नाना) साठे, राहुल मराठे, कर्मचारी शेखर सोमण, नागरिक पराग मेहता तसेच हृदयविकार तज्ञ डॉ.उदय पाटील, डॉ.उत्तम म्हस्के, डॉ.दिशा उपाध्याय, डॉ.पूजा दळवी आदी उपस्थित होते.

सुधागड तालुक्यात आदिवासी व दरडोई उत्पन्न कमी असलेले लोक अधिक आहेत. त्याबरोबरच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णांना पदरमोड करून खाजगी दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते.  मात्र खाजगी दवाखान्यात उपचारसाठी भरमसाठ रक्कम मोजावी लागत असल्याने उपचार घेणे अवघड होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन गोरगरिबांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी यासाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट व सुरज हॉस्पिटल तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारावरील तज्ञ डॉक्टरांमार्फत सेवा देण्यात आली. यावेळी 300 रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले त्यामध्ये 60 हृदयविकार, 130 मेंदू चे आजार, 90 मणक्याचे आजार, ऑर्थोपीडीक  20 अशा रुग्णांना औषधांसह मोफत उपचार देण्यात आले.

Web Title: free checking poor patients in pali raigad