ताडगाव येथे मोफत आरोग्य शिबीर, 82 रुग्णांनी घेतला लाभ

अमित गवळे
गुरुवार, 24 मे 2018

पाली - सुधागड तालुक्यातील दुर्गम असलेल्या ताडगाव येथे गुड डुअर्स चॅरिटीज (घाटकोपर) मुंबई, ताडगांव खेमवाडी दुधणी कोटबेवाड़ी (टिकेडीके) परिसर विकास संघर्ष समिती आणि जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. या आरोग्य शिबीराचा ८२ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

या शिबीरामध्ये मोतीबिंदू , व्हिटॅमिन डी ३ कमतरता आणि सांध्येदुखीचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळले.  अशा स्वरूपाचे मोफत आरोग्य शिबीर पुढील प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी होणार असल्याचे सचिन साठे यांनी सांगितले. आगामी शिबिराचे आयोजन रविवार 17 जुनला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडगांव येथे होणार आहे. 

ताडगांव ग्रामपंचायतीमध्ये जवळपास ८०% आदिवासी भाग आहे. त्यामुळे पुढील काळात जास्तीत जास्त आदीवासी लोकांना शिबीराचा फायदा होणार आहे. 

गुड डुअर्स चॅरिटीज (घाटकोपर) मुंबई यांच्या माध्यमातून डॉ. मिलन शेट आणि डॉ. अमर कारिया यांनी आरोग्य शिबीरासाठी नि:स्वार्थपणे मदत केली. तसेच प्रा. उमेश  सिंग, नीता सिंग, प्रो. सागर ,संजय, अनुज, मनोज, दिव्यांषू ,संदीप शिलोत्री आणि श्रेया यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी आपले योगदान दिले. युवा मित्र मंडळ ताडगांव मधील सचिन साठे, शैलेश साठे, सोमनाथ जाधव, मंगेश देशमुख, राकेश साठे, केतन साठे, महेश देशमुख, सुरेश देशमुख ,नरेश देशमुख ,रोशन साठे ,संतोष साठे आदींनी मेहनत घेतली. यावेळी  ग्रुप ग्रामपंचायत ताडगांवचे सरपंच छब्या जाधव, माजी सरपंच आप्पा खताळ उपस्थित होते. टिकेडीके विकास संघर्ष समितीचे सचिव सचिन साठे, अध्यक्ष बाळासाहेब धायगुडे, जय भैरवनाथ युवा मित्र मंडळ ताडगांव चे अध्यक्ष राकेश साठे यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Free health camp at Tadgaon, 82 patients benefit