घागरूम घडवतात वेगवेगळ्या रूपात गणेशमूर्ती

घागरूम घडवतात वेगवेगळ्या रूपात गणेशमूर्ती

मंडणगड - तालुक्‍यातील धामणी येथील घागरूम कुटुंबीय भक्तांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या रूपातील गणपती आणि अंबा मातेच्या मूर्ती साकारत आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून शंकर घागरूम यांनी जोपासलेली ही कला आता शैलेश व समीर या मुलांकडे आली आहे. देव्हारे पंचक्रोशीत त्यांच्याकडील मूर्तींना प्रचंड मागणी असून हस्तकलेने घडविलेल्या लक्षवेधी मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. विशेष म्हणजे आकारास आलेल्या मूर्तींमधून विविध प्रकारचा संदेश व्यक्त करण्यावर त्यांचा भर असतो.

शंकर घागरूम यांना तिसरीत मूर्ती घडविण्याचा छंद लागला. फोटो पाहून मूर्ती बनविण्यास सुरवात केली. सुरवातीला काही वर्षे रानातून चिखल माती आणून मूर्ती घडविल्या. त्यांची भेट दापोलीच्या असोंड येथील नामेबुवा यांच्याशी झाली. त्यांनी घागरूम यांना प्रोत्साहित करून शाडू मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रेरित केले. त्यांचा हा वारसा चिरंजीव शैलेश आणि समीर यांनी आत्मसात केला आहे. घरातच कारखाना उभारला असून विविध गणेशमूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. फक्त दिवसाच मूर्ती बनविण्याचा त्यांचा शिरस्ता आहे. त्यासाठी ते मे महिन्यातच सुरवात करतात. आजही देव्हारे येथील भुवड यांना एक आणे घेत दिलेली पहिली मूर्ती त्यांच्या स्मरणात आहे.

कुणबी भवनच्या राजाच्या मूर्तीचा मान
तालुक्‍यातील कुणबी समाजाच्यावतीने मंडणगड कुणबी भवन येथे विराजमान होणारा ‘कुणबी भवनचा राजा’ अशी ओळख असणारी गणेशमूर्ती घडविण्याचा मान घागरूम यांना देत त्यांच्या कलेचा गौरव केला आहे. या राजाची विसर्जन मिरवणूक २१ किलोमीटर लांब असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com