विद्यार्थ्यांना आवडते क्षेत्र निवडू द्यावे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

'विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार क्षेत्र, स्पर्धा निवडण्यास पालकांनी सहकार्य केले पाहिजे,' असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांनी डॉटकॉम्सच्या कार्यक्रमात केले

कुडाळ - 'विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार क्षेत्र, स्पर्धा निवडण्यास पालकांनी सहकार्य केले पाहिजे,' असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई यांनी डॉटकॉम्सच्या कार्यक्रमात केले. डॉट कॉम्स असोसिएशन संस्थेमार्फत 2016-17 मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये शिष्यवृत्ती व प्राविण्य मिळविलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण समारंभ नुकताच मराठा हॉल येथे झाला.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई होते. या प्रसंगी कुडाळ तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी सुर्यभान गोडे, विस्तार अधिकारी सुनिता भाकरे, उदय शिरोडकर, भिकाजी तळेकर, संस्थेचे अध्यक्ष संजय बगळे, राजाराम गवाणकर, संस्थेचे संचालक तसेच पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बगळे यांनी केले. गोडे यांचे मनोगत झाले. शिरोडकर यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी संस्थेचे नाव डॉट कॉम्स असे वेगळे ठेवण्याचा उद्देश सांगितला. निवेदन महेश कुंभार व आभार प्रदर्शन समीर राऊळ यांनी केले. श्रीमती भाकरे, भिकाजी तळेकर तसेच पालकवर्गांनीही आपले मनोगत व्यक्त केले.