सरकारी बाबूंना, हायफाय जीवनशैलीला प्राधान्य

प्रकाश पाटील
मंगळवार, 16 मे 2017

मुलगा, मुलगी काय करतात - पालकांना सामाेरे येणारे प्रश्‍न

सावर्डे - एकमेकांना पाहण्यासाठी मुलगा-मुलगी जाण्याआधी मुलीच्या घरच्यांकडून पहिला प्रश्‍न विचारला जातो, मुलगा काय करतो? नोकरीला आहे का? नोकरीला असेल तर सरकारी आहे का? मुंबईत असेल तर घर आहे का? अशा एक ना अनेक प्रश्‍नांची नवऱ्याकडील मंडळींना समाधानकारक उत्तरे द्यावी लागतात. मुलगा सरकारी बाबू असेल तर त्याचा भाव वाढतो; मात्र उच्चविद्याविभूषित असूनही नोकरी नसलेल्याला डिमांड कमी आहे. व्यावसायिकांना नोकरीनंतरच प्राधान्य मिळते.

अलीकडच्या दोन दशकात मॉडर्न, हाय-फाय संस्कृती शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात रुजत आहे. हायफाय जीवन जगण्याकडे तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. पूर्वी अज्ञानाचे प्रमाण अधिक असल्याने बहुतांश मुली शेतकरी किंवा बेरोजगार असलेला नवरा पसंत करत; मात्र अलीकडच्या तीन दशकांत ही स्थिती राहिली नाही. अनेक उच्चशिक्षित तरुणांना नोकऱ्या नसल्याने त्यांचा विवाह अडथळ्याची शर्यत बनला आहे.

उच्चशिक्षण घेऊन नोकऱ्या नसल्याने अनेक तरुण-तरुणी वय झाले असले तरी त्यांच्या हातात लग्नाच्या बेड्या पडल्या नाहीत. शेतीवाडी भरपूर असूनही वधू पिता नोकरी नसेल तर नकार देतो. तसेच अलीकडे वायफाय संस्कृती रुजल्याने ‘ॲरेंज मॅरेंज’ संस्कृती कमी झाली. लव्ह मॅरेज संस्कृती बोकाळली आहे. त्यामुळे वर आणि वधू पित्यासमोर अनेक अडचणी निर्माण होताना दिसत आहे. आपल्या मनाविरुद्ध विवाह ठरला तर घरच्यांना वाऱ्यावर सोडून अज्ञातस्थळी जाऊन विवाह केला जातो. या विवाहाला विरोध झाल्यानंतर आत्महत्येसारखे पर्याय अवलंबिले जातात. अशाने सामाजिक प्रश्‍नही निर्माण झाले आहेत.

प्रत्येक कुटुंबीयांची पसंती ही नोकरदार वधू-वरास आहे. त्यामुळे सर्वसाधारण खासगी आणि कमी पगाराच्या नोकरदारास मुलींकडून नकार मिळतो. एखादा मुलगा दिसायला चांगला असतानाही तो बेरोजगार असल्याने मुलीच्या नकाराला सामोरे जावे लागते. तसेच काही वधू-वरांचा कल देखणेपणावर असतो.
- गणेश दिवटे, गणेश वधू वर सूचक केंद्र, चिपळूण