ग्रामपंचायतीतून बॅंकिंग, एटीएम सेवेला खीळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

राजापूर - ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांमध्ये बॅंकिंग सुविधा सुरू होणार आहे. त्याचवेळी ग्रामीण जनतेला एटीएमसारखी आधुनिक बॅंकिंग सुविधाही उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये एटीएम सेवा सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा ग्रामपंचायतींमध्ये आहेत का, याची चाचपणी आता प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.

राजापूर - ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांमध्ये बॅंकिंग सुविधा सुरू होणार आहे. त्याचवेळी ग्रामीण जनतेला एटीएमसारखी आधुनिक बॅंकिंग सुविधाही उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये एटीएम सेवा सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा ग्रामपंचायतींमध्ये आहेत का, याची चाचपणी आता प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.

एटीएम सेवा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये अन्य सुविधांसोबत इंटरनेट सुविधा चोवीस तास कार्यान्वित असणे गरजेचे आहे. मात्र त्याचीच वानवा अनेक ग्रामपंचायतींमध्ये आहे. जेथे ती सेवा आहे, तेथे त्याचा बोजवारा उडालेला असतो. त्यामुळे गावांमध्ये बॅंकिंगसह एटीएम सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला इंटरनेटचा अभाव ही मोठीच अडचण ठरणार आहे.

ग्रामीण जनतेला बॅंकिंग सेवा देण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सोबत एटीएम सेवाही देण्याचा विचार आहे. एटीएम सेवा ग्रामपंचायतीतून देण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये विद्युत पुरवठा, एटीएमची सुरक्षा, संगणक सुविधा, प्रिंटर यांच्यासह इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध आहेत का, याची प्रशासकीय पातळीवर चाचपणी सुरू झाली आहे. त्यामध्ये तालुक्‍यातील १०१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

शासनाच्या संग्राम उपक्रमांतर्गंत ग्रामपंचायती संगणकदृष्ट्या चांगल्याच सक्षम झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये खासगी मोबाइल कंपन्या वा बीसएनएलच्या इंटरनेटची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये बॅंकिंग सुविधा सुुरू होताना एटीएमही सुरू करणे शक्‍य होईल. तालुक्‍यातील ९० टक्के ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. मात्र मोबाइल कंपन्यांच्या रेंजअभावी इंटरनेट मिळणे कठीण जाते. त्यामुळे ही सुविधा सध्यातरी कागदोपत्रीच आहे. त्यामुळे गावागावांमध्ये एटीएम सेवा सुरू करण्याचा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यास अवधीच जाणार आहे.

कोकण

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे. आता पुन्हा जिल्ह्याला चांगले दिवस येणार असा विश्वास...

02.06 PM

गोवा विद्यापीठाचे संशोधन - पर्यटनाला वेगळी ओळख देण्याची ताकद सावंतवाडी -...

08.57 AM

विद्यार्थ्यांची सोय लगतच्या शाळेत : 50 शिक्षक अतिरिक्‍त ठरणार कणकवली -...

08.57 AM