ग्रामपंचायतीच्या तिजोरीत ४२ कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

घरपट्टीची विक्रमी वसुली - ग्रामविकास विभागाची कामगिरी

रत्नागिरी - घरपट्टी आकारणीची पध्दत बदलण्याचा ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला होता. त्यामुळे २०१५-१६ या आर्थिक वर्षातील कर वसूली झाली नव्हती. त्यामुळे मार्च २०१७ पर्यंत दोन्ही वर्षांची वसूली करण्याचे ग्रामविकास विभागापूढे आव्हान होते. तालूकानिहाय आढावा आणि उत्तम नियोजनामुळे ५० कोटी १९ लाख रुपयांपैकी फेब्रुवारी अखेरीस ४२ कोटी ४६ लाख रुपये वसूल करणे शक्‍य झाले आहे. जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाने विक्रमी वसूली केली आहे. मार्चअखेरपर्यंत त्यात आणखीन भर पडणार आहे.

घरपट्टी आकारण्याचे जून सुत्र बदलण्याचा निर्णय ग्राम विकास विभागाने घेतला. क्षेत्रफळानुसार कर आकारणीचे नवे नियम मार्च २०१६ पर्यंत जाहीर केले. आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे नवीन सूत्र निश्‍चित झाल्याने कर आकारणीबाबत संभ्रमावस्था होती. ग्रामसेवकही मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत होते. . त्यामूळे २०१५-१६ ची घरपट्‌टी वसूल करता आली नाही. त्याचा फटका ग्रामपंचायतींनाही बसला. मोठे नूकसान सहन करावे लागले.

तिजोरीतही खडखडाट झाला होता. कर आकारणीतील सूसुत्रता आणण्यात चार महिन्यांनी यश आले. मागील वर्षांची थकबाकी २१ कोटी रुपये शिल्लक होती. चालू आर्थिक वर्षाची घरपट्‌टी २९ कोटी ४६ लाख रुपये होती. दोन्ही वर्षांची एकत्रित करवसूली करण्याचे अशक्‍यप्राय आव्हान होते.

ग्रामविकास विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणावरील घरपट्टी वसूलीसाठी सूत्रबध्द नियोजन करण्यात आले. गावपातळीवर तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांच्या नियमित बैठका घेऊन आढावा घेतला जात होता. त्यामुळे अधिकारीही वसुलीला प्राधान्य देत होते. ग्रामविकास विभागाने वसुलीला प्राधान्य दिल्याने त्याचा फायदा वार्षिक वसुलीचा टक्‍का वाढण्यात झाला. विक्रमी वसुली झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे.

करवसूली करण्यासाठी तालूकानिहाय आढावा बैठका घेण्यात येत होत्या. त्यामूळे प्रत्येक तालुक्‍यातून जबाबदारीने काम सुरु होते. मागील वर्षी घरपट्‌टी जमा केलेली नसल्याने ग्रामस्थांकडूनही विरोध झाला नाही.
- विश्‍वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.

तालुकानिहाय करवसुली
 मंडणगड.......................१३७१८३३९
 दापोली........................४४४८६२९०
 खेड...........................५११०८०८१
 चिपळूण.......................५८५२५४८०
 गूहागर.........................६७४३५३९४
 संगमेश्‍वर.......................४४९१९७९०
 रत्नागिरी........................९६७५२७८०
 लांजा...........................१५८९५७६३
 राजापूर..........................३१७६८६४३

Web Title: grampanchyat money balance