ढोल-ताशांच्या गजराने चिपळूण दुमदुमले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

चिपळूण - अभूतपूर्व उत्साहाने सहभागी झालेली बच्चेकंपनी, तरुणाई व ज्येष्ठांनी ढोल-ताशे आणि झांज पथकांच्या गजरात देवरुखात शोभायात्रा निघाली. चित्ररथ, महिलांचे ढोल व झांजपथक, चालत्या ट्रकमध्ये मल्लखांबावरती केलेली प्रात्यक्षिके शोभायात्रेचे आकर्षण ठरले. 

शहरातील श्री. जुना कालभैरव येथून शोभा यात्रेस सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुरवात झाली. शहरातील विघ्नहर्ता ग्रुप, संस्कार भारती (युनायटेड), जय हनुमान शंकरवाडी, जुना कालभैरव, सिद्धिविनायक पेठमाप, देवधरनगर, पाग व्यायामशाळा, समर्थ ग्रुप आदी शोभायात्रेत सहभागी झाले होते. जुना काभैरव, जिप्सी कॉर्नर, चिंचनाका, बाजारपेठमार्गे शोभायात्रा काढण्यात आली. नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे शोभायात्रेच्या अग्रस्थानी होत्या. मंडळ व संस्थांचे तरुण, तरुणी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी खेळांचे सादरीकरण करीत होते. विशेष म्हणजे महिला, शालेय विद्यार्थिनींचे ढोल व झांज पथकांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. शिवरायांची वेषभूषा, भगवे ध्वज, पताके यासह तरुण, तरुणी, शालेय विद्यार्थ्यांनी भगवे फेटे परिधान केल्याने अवघा परिसर भगवेमय झाला होता. पाग व्यायामशाळेच्या खेळाडूंनी चालत्या ट्रकमध्येच मल्लखांबावर कसरती केल्या. शोभायात्रेमुळे वाहतूक कोंडी होणार नाही, याची वाहतूक पोलिसांनी दक्षता घेतली होती. शोभायात्रा व नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. 

Web Title: gudhi padwa celebration in chiplun