'महाराष्ट्र बंद'पासून उत्तर रत्नागिरी लांबच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

व्यापारावर परिणाम नाही : भाजी मंडईदेखील सुरू
गुहागर - शेतकरी संप पुन्हा सुरू करण्याच्या इराद्याने सोमवारी (ता. 5) महाराष्ट्र बंदची हाक विविध शेतकरी संघटनांनी दिली होती.

व्यापारावर परिणाम नाही : भाजी मंडईदेखील सुरू
गुहागर - शेतकरी संप पुन्हा सुरू करण्याच्या इराद्याने सोमवारी (ता. 5) महाराष्ट्र बंदची हाक विविध शेतकरी संघटनांनी दिली होती.

शिवसेननेही मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात बंदला पाठींबा दर्शविला; मात्र उत्तर रत्नागिरीमध्ये या बंदचा कोणताही परिणाम दिसून आलेला नाही. मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या तालुक्‍यातील व्यापार सुरू आहे. चिपळूण बाजारपेठ आज बंद असते. तरीही येथील भाजी विक्रेत्यांची दुकाने सुरू आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या दुध आणि भाजीपाल्याच्या गाड्या आज पाचही तालुक्‍यातील सर्व बाजारपेठांमध्ये निर्विघ्नपणे पोचल्या. त्यामुळे भाजी वा दुधाचा तुडवडा नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या संपामुळे पहिले दोन दिवस फार मोठा परिणाम बाजारपेठवर झाला नव्हता. तिसऱ्या दिवशी भाजी न आल्याने भाज्यांचे दर कडाडले, दुधाचा तुडवडा भासला; मात्र आणिबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. आजही महाराष्ट्र बंद आणि शेतकरी संपाचा कोणताही परिणाम उत्तर रत्नागिरीत दिसून येत नाही.

रत्नागिरी, लांजा, देवरूखातील बाजारपेठ सुरू
दरम्यान, राजापूर वगळता लांजा, संगमेश्‍वर, देवरूख, रत्नागिरीमध्येही या बंदला प्रतिसाद मिळालेला नाही. राजापूरमध्ये व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला असला तरी राजापूर तालुक्‍यातील पाचल बाजारपेठ सुरू होती. रत्नागिरी, लांजा, देवरूख बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू होते.