सवलतधारकांसाठी एसटीचे स्मार्ट कार्ड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

बोगस प्रवाशांना पायबंद - ऑनलाईन नूतनीकरण सुविधा मिळणार

गुहागर - बनावट ओळखपत्राच्या आधारे फसवणूक करणाऱ्यांना रोखण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. पासधारक आणि सवलतधारकांना देण्यात येणारी ही स्मार्ट कार्ड आधार कार्डबरोबर जोडून बनविली जातील. त्यामुळे आर्थिक नुकसान थांबेल, तसेच दररोज प्रवासी आणि वाहकांमध्ये होणारे वाद संपुष्टात येतील, असा विश्वास एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

एसटी महामंडळातर्फे अंध व अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, काही पुरस्कारप्राप्त व्यक्ती, ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थिनी, मासिक त्रैमासिक पासधारक आदी ३४ श्रेणीतील व्यक्तींना तिकिटामध्ये सवलत दिली जाते; मात्र काही प्रवासी बोगस ओळखपत्राद्वारे एसटीला फसवतात. अपंग नसलेल्या व्यक्तीजवळही अपंगत्वाचे ओळखपत्र असते. अंध व्यक्तीसोबत जवळच्या एका व्यक्तीला सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. या सवलतीचा फायदाही अनेकजण उठवितात. अनेक वेळा वयाचा खोटा दाखला जोडून घेतलेल्या ओळखपत्राद्वारे प्रवास करणाऱ्या व्यक्तीशी चालक-वाहकांचा वाद होतो. काही वेळा वाहक-चालकांवर मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्या, तेव्हा तपासाअंती तक्रारदारच दोषी असल्याचे आढळून आले. या समस्यांवर एसटी महामंडळाने उपाय शोधला. सवलत आणि पासधारकांना आता स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड बनवितानाच ती व्यक्ती लाभ घेण्यासाठी पात्र आहे का याची अचूक माहिती मिळणार आहे.

नूतनीकरण स्वतः करता येणार
विद्यार्थी पासधारक व मासिक, त्रैमासिक पासधारकांना स्मार्ट कार्डमुळे पास नूतनीकरणासाठी एसटी आगारातील खिडकीवर गर्दी करण्याची आवश्‍यकता नाही. ऑनलाईन पद्धतीने पासधारक स्वत:च स्मार्ट कार्डचे नूतनीकरण करू शकतील. यामुळे बोगस सवलतधारकांना पायबंद बसेल. सवलत आणि पास योजनेमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता येईल, अशी माहिती एसटी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितली.

टॅग्स

कोकण

सावंतवाडीः सिंधुदुर्गात पावसाने कहर केला आहे. सोमवारी (ता.18) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक...

04.36 PM

मंडणगड : तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून सतत तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून तालुक्यातील भारजा, निवळी नद्या धोक्याची पातळी...

04.24 PM

मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ठिकठिकाणी झाडे उन्मळून...

02.18 PM