गुहागर नगराध्यक्ष वरंडे यांचा राजीनामा 

गुहागर नगराध्यक्ष वरंडे यांचा राजीनामा 

गुहागर - येथील नगराध्यक्षा सौ. स्नेहा वरंडे यांनी दीड वर्ष पूर्ण झाल्यावर पदाचा राजीनामा दिला. आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर नगरपंचायतीमध्ये सभापतींचा खांदेपालट होईल, असे सांगितले होते. त्यानंतर अचानक मंगळवारी नगराध्यक्षांनी रत्नागिरीत जाऊन राजीनामा सादर केला. मिळालेल्या संधीला 100 टक्के न्याय देता आला नाही, तरी प्रामाणिकपणे काम केले; मात्र 15 दिवसांपूर्वी नगरपंचायतीच्या वेबसाइटवरून भ्रष्टाचाराच्या आरोपाने मी व्यथित झाले आहे, असे सौ. वरंडे यांनी राजीनाम्यानंतर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

वर्षभरात गुहागर नगरपंचायतीची निवडणूक आहे. त्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सभापती बदलले जातील, असा अंदाज व्यक्त होत होता; मात्र आठवडाभरापूर्वी आमदार जाधव यांनी सभापतिपदी खांदेपालट होईल. अध्यक्ष, उपाध्यक्ष तेच राहतील, असे सांगितले होते. तरीही वरंडे यांनी राजीनामा दिला, याची चर्चा सुरू आहे. 

पत्रकात सौ. वरंडे यांनी जाधव व जनतेचे आभार मानले. गेल्या चार वर्षांत गुहागर नगरपंचायतीमार्फत 15 कोटींची कामे नगरोत्थान, तसेच रस्ता अनुदानमधून झाली. रस्ते, पाखाड्या, एलईडी पथदिवे, चौक सुशोभीकरण, स्वच्छतागृह, स्मशानभूमी नूतनीकरण, समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षकांची नियुक्ती आदी कामे करण्यात आली. शहरात नव्याने पथदीप बसविणे, युवकांसाठी ओपन जीम या कामांबाबत कार्यवाही सुरू आहे. नवीन पाणी योजनेचा प्रस्ताव व 14 कोटींचे अंदाजपत्रक तयार आहे. सुरवातीला उपनगराध्यक्ष व नंतर दीड वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करताना साऱ्यांचे सहकार्य मिळाले. 

""नगराध्यक्ष सौ. वरंडे यांनी दीड वर्षाच्या कालावधीवर समाधानी असल्याचे सांगत दुसऱ्यांना संधी द्यावी, अशी विनंती केली. त्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर अन्य नगरसेवकांना संधी देण्यात येणार आहे. नगराध्यक्षांच्या निवडीनंतर उपनगराध्यक्ष राजीनामा देतील.'' 
- भास्कर जाधव, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com