स्वाईन फ्लू टाळण्याबाबत गुहागर येथे कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

गुहागर - आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांसाठी स्वाईन फ्लूबाबत कार्यशाळा झाली. कार्यशाळेत स्वाईन फ्लूसारखे गंभीर रोग टाळण्यासाठी उपाय, आरोग्य विभाग कशाप्रकारे मदत करेल याची माहिती व चर्चा झाली. साथीच्या आजारांचे संशयित रुग्ण आढळल्यास आरोग्य विभागास कळवावे, असे आवाहन डॉ. घनश्‍याम जांगीड यांनी केले.

उघड्यावर खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे तसेच स्वाईन फ्लूबाधित व्यक्तीशी झालेल्या संपर्काने, त्याच्या वस्तू वापरल्याने हा आजार पसरू शकतो. रोगापासून बचाव व्हावा यासाठी स्वच्छता हा एकमेव मूलमंत्र आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगीड यांनी दिली. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी गुहागर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश भाले, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. मंदार आठवले, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सत्यार्थप्रकाश बलवंत, हेदवी आरोग्य केंद्राचे डॉ. प्रताप गुंजोटे, डॉ. पंकज देशमुख, दत्तात्रय मुद्दमकार, सागर मोरे, समीर आंब्रे यांनी सहकार्य केले.