हर्णैमधील काही युवकांचे मोबाइल एटीएसच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

दाभोळ : तबरेज तांबे "इसिस'मध्ये सामील झाल्याच्या वृत्ताने हर्णैमध्ये धक्का आणि अविश्‍वास अशा भावना प्रकट झाल्या. ही हानी भरून कशी काढायची, यामुळे मोहल्ल्याची प्रतिमा खराब झाली, असे मत व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर त्याला फसवून जाळ्यात ओढले असावे, असे मतही व्यक्त होत आहे. दरम्यान, तबरेजच्या लग्नात साक्षीदार असलेल्यांकडून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) त्याची माहिती घेतली. त्याच्या मित्रांचीही चौकशी होणार आहे. काहीजणांचे मोबाइलही एटीएसने ताब्यात घेतले आहेत.

हर्णैमध्ये लहानाचा मोठा झालेला तबरेज "इसिस'मध्ये सामील झाला असल्याची माहिती वाचून हर्णैवासीयांना धक्‍काच बसला. तो अशा संघटनेत सामील होईल, असे तो पूर्वी राहत असलेल्या बंदर मोहल्ला येथील त्याच्या शेजाऱ्यांनाही कधी वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया तबरेज तांबे याच्या घराशेजारी राहणाऱ्या मंडळींनी दिली.

"इसिस'शी संबंध असल्याच्या संशयावरून दापोली तालुक्‍यातील हर्णै येथील तबरेजच्या घराची एटीएसच्या पथकाने कसून झडती घेतली. हर्णै येथील काही युवकांचे मोबाइलदेखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

कोकण

सावंतवाडी : होडावडा येथील निसर्गमित्र मंगेश माणगावकर यांच्या बागेत बेडूक,...

11.24 AM

प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा; आज दिल्लीवारी शक्‍य कणकवली / सावंतवाडी -...

07.24 AM

हेलियम वायूचा इथेच लागला शोध : पर्यटकांबरोबरच अभ्यासकांनाही किल्ला घालतोय साद...

05.51 AM