साळिस्ते येथील तरुणाला हवा मदतीचा हात

तुषार सावंत - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

सोनू मेस्त्री यांना मदत करण्यासाठी त्यांची पत्नी मयूरी यांच्या बॅक ऑफ इंडिया शाखा तळेरे शाखेतील १४७८१०११०००२१६३ या खाते क्रमांकावर (IFSCBKID०००१४७८) थेट मदत करावी, असे आवाहन केले आहे.

कणकवली - घरात अठरा विश्‍व दारिद्य्र त्यातच दोन्ही किडनीच्या आजाराने डायलेसिसची वेळ ओढवलेल्या साळिस्ते (ता. कणकवली) येथील सोनू मेस्त्री (वय ४५) या तरुणाला हवा आहे मदतीचा हात. सोनू यांच्यावर सध्या कोल्हापुरात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

साळिस्ते मेस्त्रीवाडी येथील सोनू श्रीधर मेस्त्री हे सुतारकामासाठी कोल्हापुरात होते. त्यांची पत्नी मयूरी या आपल्या दोन मुलासह साळिस्ते येथे राहतात. मुलगी तन्वी ही सातवी तर मुलगा सोहम हा पाचवीत गावातील पूर्ण प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. 

वडिलांच्या आजारामुळे या दोन्ही मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. सोनू मेस्त्री गेले सहा महिने दोन्ही किडनीच्या आजारानी त्रस्त आहेत. रुग्णालयात नियमितपणे डायलेसिस करून घेतले जात आहे. यासाठी काही नातेवाईकांनी मदत केली. गावातील निवृत्त प्राथमिक शिक्षक तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर ताम्हणकर हे मदत मिळविण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्नशील आहेत. सोनू यांच्या किडनी आजारपणातील डायलेसिसचा खर्च मेस्त्री कुटुंबीयाना परवडणार नाही. अजून काही दिवस उपचार झाले तर सोनू हे बरे होऊ शकतात; पण त्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची दाणशूर व्यक्तीनी सोनू मेस्त्री यांना मदत करण्यासाठी त्यांची पत्नी मयूरी यांच्या बॅक ऑफ इंडिया शाखा तळेरे शाखेतील १४७८१०११०००२१६३ या खाते क्रमांकावर (IFSCBKID०००१४७८) थेट मदत करावी, असे आवाहन केले आहे.

कोकण

महाड - अलिशान मोटारीतून जाणाऱ्या सराफाला प्राप्तिकर अधिकारी असल्याची बातावणी करून लुटणाऱ्या तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी...

12.12 AM

आंबा, काजू बागायतदारांना पीक विम्‍यापोटी १६ कोटी प्राप्‍त रत्नागिरी - जिल्ह्यात यावर्षीचा आंबा हंगाम बहूतांश बागायतदारांना...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुलाखतीमधून निवड - दहा नावे कोकण आयुक्‍तांकडे रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुकास्तरावरुन २५...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017