महाडमध्ये घर कोसळले

The house collapsed in Mahad
The house collapsed in Mahad

महाड : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने घरे व इमारतींना धोका निर्माण झाला असुन तालुक्यातील खुटील हनुमानवाडी येथे पावसामुळे घर कोसळले तर सव येथे गोठ्याला आग लागल्याने तीन गुरे जळून मरण पावली.

दोन दिवसांपूर्वीही एक घर व गोठा कोसळल्याची घटना तालुक्यात घडली होती. सव येथील रविंद्र गोपीचंद जाधव यांच्या गोठ्यात शेगडीतून धूरी करण्यात आली होती. यामुळे काल रात्री अचानक आग लागली यात दोन बैल व एका गायीचा होरपळून मृत्यु झाला. तर संपूर्ण गोठाच आगीत जळून भस्मसात झाला. 

खुटील हनुमानवाडी बळीराम जगताप यांचे घर कोसळले यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. महाड तहसिल कार्यालयाने या ठिकाणचे पंचनामे केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com