सिंधुदुर्गनगरी : तीर्थक्षेत्रांसाठीच्या निधीत शासनाकडून भरघोस वाढ

‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राला निधी वाढवून देण्यास शासनाने मान्यता दिली
Fund
FundEsakal

सिंधुदुर्गनगरी : ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राला निधी वाढवून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यापूर्वीच्या ३० लाख रुपयाच्या निधीवरून तो आता ६० लाखापर्यंत वाढविण्यात आला आहे. सहाजिकच यामुळे निधीअभावी रखडलेल्या अनेक देवस्थानाची कामे पूर्णत्वास जाण्यासाठी मदत होणार आहे.

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दिवसेंदिवस देव दर्शनासाठी भाविक यात्रेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा ठिकाणी यात्रेकरूसाठी विविध सोयीसुविधा, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी, असे अपेक्षित असते. ग्रामपंचायतीच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे सुविधा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाना अनुदान देण्याची योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत निधी संबंधित तीर्थक्षेत्रास एकरकमी किंवा टप्प्याटप्प्यात उपलब्ध करून देण्यात येतो.

या निधीतून मुख्य रस्त्यापासून तीर्थक्षेत्र यात्रा स्थळापर्यंतचे रस्ते, पथदिवे, मंदिर परिसरात संरक्षक भिंतीचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधणे, तीर्थक्षेत्राच्या जवळ नदी किंवा ओढा असेल तर त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे, स्त्री-पुरुष शौचालय, स्नानगृहे बांधणे, भक्तनिवास बांधणे, तीर्थक्षेत्राचा परिसर सुशोभित आणि स्वच्छ राहावा यासाठी प्रयत्न करणे, वाहनतळाची सोय करणे आदी कामे करता येतात. या अगोदर ३० लाखाच्या मर्यादित निधीमध्ये टप्प्याटप्प्याने कामे करावी लागत होती. आता या निधित दुप्पट वाढ झाल्याने अनेक विकास कामे मार्गी लागून देवस्थानच्या सौंदर्यात भर पडणार आहे. ग्रामपंचायतीला सुद्धा या निधीचा चांगला फायदा होणार आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com