मोहोपाडा येथील मच्छीमार्केटचे उद्घाटन

rasayni
rasayni

रसायनी (रायगड) - रसायनी पाताळगंगाचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथील मच्छीमार्केटचे गुरुवार ( ता 20 ) रोजी उदघाटन आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण,सभापति ऊमाताई मुंढे, खालापुर तालुका पंचायत समिति सदस्या वृषाली पाटील, मोहोपाड्याचे सरपंच ताई पवार, उपसरपंच दत्तात्रेय शिंदे, मोहोपाड्याचे माजी सरपंच संदीप मुढे, कृष्णा पारंगे, राष्ट्रवादी काँग्रेस मोहोपाडा विभागीय अध्यक्ष कैलास म्हात्रे, नेते नंदु पाटील, अनिल पिंगळे, रवीन्द्र पाटील, वर्षा पाटील, आदि उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत विक्रेत्यांच्या वतीने करण्यात आले. 

मोहोपाड्याचे माजी सरपंच संदीप मुंढे यांनी 2006 साली पुढाकार घेतला आणि विक्रेत्यांसाठी स्वतंत्र मच्छीमार्केट बांधुन दिले. मच्छीमार्केट मधील गाळ्यांची मागील दोन तीन वर्षा पासुन दुरावस्था झाली होती. विक्रेत्यांनी पुन्हा मुंढे यांच्याकडे डागडुजी मागणी केली होती. संदीप मुंढे यांनी पुन्हा लक्ष घालुन नुतनीकरण करून दिले आहे. आधुनिक वस्तुने व आधुनिक पध्दतीने काम करण्यात आले आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी खुप समाधान व्यक्त केले आहे. तसेच उमाताई मुंढे यांनी जिल्हा परिषद योजनेतुन या कामाला निधी उपलब्ध करून दिला आहे असे सांगण्यात आले. 

मच्छीमार्केटचे बांधकाम करताना स्वच्छतेचे महत्व आणि बांधकाम जास्त दिवस टिकले पाहिजे या बाबी लक्षात घेतल्या आहे. त्यासाठी आधुनिक वस्तुने आणि आधुनिक पध्दतीने काम केले आहे. तर रायगड जिल्ह्यात हे एक उत्कृष्ट मच्छीमार्केट म्हणुन ओळखले जाईल.
- संदीप मुंढे, सदस्य व माजी सरपंच, वासांबे मोहोपाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com