जैतापूर खाडीकिनारी महाकाय माशाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

राजापूर- तालुक्‍यातील जैतापूर-माडबनच्या खाडी किनाऱ्यावर सापडलेल्या ब्ल्यू व्हेल प्रजातीच्या महाकाय माशाला वनविभागाने स्थानिक मच्छीमार आणि रहिवाशांच्या साथीने आज दोन बोटींच्या साह्याने जीवदान दिले. हा महाकाय मासा सुमारे 47 फूट लांब होता. त्याचे वजन 15 टन असावे. सुमारे 24 तासांहून अधिक काळ या माशाला जीवदान देण्याची मोहीम सुरू होती. 

समुद्राच्या खोल पाण्यामध्ये वावरणारा हा मासा खाडीकिनारी कसा आला, याबाबत नेमके कारण समजू शकले नाही. रत्नागिरी जिल्ह्यात अशा तऱ्हेने महाकाय माशाला जीवदान देण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात पंचनदी किनारी असेच माशाला पुन्हा खोल समुद्रात लोटण्यात आले होते. मोठ्या जहाजाची धडक बसून जखमी झाल्याने किंवा भरतीच्या वेळी तो जैतापूर खाडीकिनारी आल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र तपासणीमध्ये त्या माशाच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या, अशी माहिती वनविभागाने दिली. 

Web Title: Jaitapur creek Borders giant fish life

टॅग्स