उत्तर प्रदेशातील शाळकरी मुलाची पोटासाठी भटकंती

तुषार सावंत
सोमवार, 26 जून 2017

आठवीतील विद्यार्थी - दिवसाला २०० रुपयांची कमाई

कणकवली - उत्तर भारतीय मंडळी मोठ्या संख्येने कोकणाकडे स्थिरावू लागली आहेत. अनेकजण रोजगारासाठी येथे येत असून, काहींनी कोकण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा आपलासा केला आहे. अशाच पद्धतीने उत्तर प्रदेशातील काणव गावातील सिंह कुटुंब सध्या कणकवलीत आहेत. त्यांचा आठवीत शिकणारा मुलगा पुढील शिक्षणासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी गोड कापूस विकत आहे. त्याची दिवसाला तब्बल दोनशे रुपयाची कमाई होत आहे. राजा सिंह हा आठवीतून नववीत जाणारा शाळकरी मुलगा गरीब आईवडिलांच्या मदतीसाठी कोठेही जाऊन वाटेल तो रोजगार करण्याची हिंमत बाळगून आहे. 

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सामान्य भारतीय नागरिक किती हा अपेष्टा सहन करून जीवन जगत आहेत याची अनेक उदाहरणे आपण पाहत आहोत. देशातील सत्ताधाऱ्यांनी ‘अच्छे दिन‘ आणण्याची स्वप्ने दाखविली. इतकेच काय तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होतील, अशी आशा दाखविली. पण सामान्य भारतीयांच्या पाचवीला पुजलेल्या अठराविश्‍व दारिद्य्रातून सुटका मात्र झालेली नाही. अशीच परिस्थिती राजा सिंह या शाळकरी मुलाच्या बाबतीत आहे. केंद्रीय शिक्षा मंडळाचे शैक्षणिक सत्र जुलैमध्ये सुरू होणार आहे. काणव गावात अतिशय हलाखिची परिस्थिती असल्याने उन्हाळी हंगामात तर रोजगार मिळणे कठीण बनते. त्यामुळे राजा सिंह याचे आई, वडील, दोन भावंडे शाळेतील मुलांना सुट्ट्या पडल्यानंतर मे आणि जून महिन्यात कणकवली गाठतात. येथे गोड कापूस बनविण्याचा व्यवसाय करून गाठीला थोडाफार पैसा जमवितात. सिंह कुटुंबियांचा राजा हा मोठा मुलगा कणकवली शहरात फिरून कापूस विक्री करतो. रोज त्याला जास्तीत जास्त दोनशे रूपयेपर्यंत कापूस विकून पैसे हाती येतात. कापूस बनविण्यासाठी छोटेसे मशिन असून यात साखर, दूध आणि खव्याचा वापर करून गोड कापूस बनविला जातो. एका प्लािस्टक पिशवीत बंद करून ५ रुपयाला हा कापूस विकला जातो; मात्र सकाळी तयार केलेला कापूस रात्रीपर्यंत विकला न गेल्यास तो पिशवीतून बाहेर काढून फेकून द्यावा लागतो, असे राजा सिंह सांगत होता. तो म्हणाला, ‘‘गेली दोन- तीन वर्षे उन्हाळ्यात आम्ही कणकवलीत येवून हा धंदा करत आहोत. काणव गावात रोजगाराची फारशी संधी नाही. त्यामुळे सुटीच्या कालावधीत कापूस विक्री करून थोडा पैसा आम्ही जमवतो. उत्तर प्रदेशात सत्तांतर होवून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असले तरी आजही ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत. केंद्र शासनाच्या उजाला योजनेंतर्गत मात्र प्रत्येक घरात मोफत स्वयंपाक गॅस सििलंडरपुरवठा करण्यात आला आहे.’’