शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल बंदी

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल बंदी

केंद्र सरकारकडून आदेश - ब्ल्यू व्हेल गेमच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कणकवली - मोबाईलद्वारे ‘ब्ल्यू व्हेल’ या खेळातून लहान मुलांच्या आत्महत्येच्या घटना समोर येत असल्याने केंद्र सरकारने आपल्या शिक्षण मंडळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलबंदीचे आदेश काढले असून, राज्य सरकारलाही आपल्या मंडळाच्या अखत्यारीतील शाळांमध्ये याचे अनुकरण करावे, असे आदेश दिले आहेत. देशभरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन, टॅबलेट, आय पॅड किंवा लॅपटॉपसारखी उपकरणे घेऊन येण्यास बंदी घातली आहे.

देशभरातील शाळामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची नवी प्रणाली विकसित झाली आहे. मात्र ‘ब्ल्यू व्हेल’सारख्या खेळामुळे या डिजिटल तंत्रज्ञानापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिक्षणात प्रभावी पठण किंवा पाठांतरासाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण करावे. विशेषतः आयटी संबंधित यंत्रणेचा गैरवापर टाळावा म्हणून केंद्रीय शिक्षण मंडळातर्फे दिशा निर्देशक जारी केले आहे. ज्या शाळांमध्ये इंटरनेटचा वापर होत असेल, तेथे अधिक सुरक्षा घेतली जावी, अशा सूचना केल्या आहेत. यासाठी शाळांमधील संगणकावर प्रभावी फायरवॉल, फिल्टर्स व अँटीव्हायरस अपलोड करावा, अशी सूचना केली आहे. शाळामध्ये स्मार्टफोन टॅबलेट आयपॅड, लॅपटॉप असे साहित्य परवानगीशिवाय आणू नये. किंबहुना विद्यार्थी वाहतूक होत असलेल्या कोणत्याही वाहनांमध्ये, स्कूलबसमध्ये अशी यंत्रणा वापरता येणार नाहीत. ही जबाबदारी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांवर दिली आहे. शाळा किंवा स्कूलबसमध्ये इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या अनिर्बंध वापरावर सक्तीची बंदी घातली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. 

शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान असावे मुलांच्या वयानुसार वरिष्ठांच्या देखरेखीखाली इंटरनेट हाताळू द्यावा. 

ऑनलाईन शिक्षण घेत असताना त्याच्या योग्य वापराकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटच्या धोक्‍याबाबत जनजागृती करावी. शाळांनी इंटरनेटचा वापर झाल्यानंतर युझरनेम व पासवर्ड बदलावा. कॉपी राईटचे पालन करावे. मुलांपर्यंत अश्‍लील सामग्री पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी. इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षित वापरासंबंधी मसुदा तयार करून त्या धोरणाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंडळाने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com