'कविता राजधानी' पुरस्काराचे म्हात्रे मानकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

रत्नागिरी - कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा कविता राजधानी पुरस्कार आघाडीचे कवी अरुण म्हात्रे यांना जाहीर झाला आहे. कोकण साहित्यभूषण पुरस्कार कवी व संपादक गुरुनाथ सामंत यांना जाहीर झाला.

रत्नागिरी - कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा मानाचा कविता राजधानी पुरस्कार आघाडीचे कवी अरुण म्हात्रे यांना जाहीर झाला आहे. कोकण साहित्यभूषण पुरस्कार कवी व संपादक गुरुनाथ सामंत यांना जाहीर झाला.

कोमसापने गेल्या महिन्यात वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर केले. आता वाङ्‌मयेतर पुरस्कारांची घोषणा पुरस्कार समितीचे निमंत्रक अरुण नेरूरकर यांनी केली. सामंत यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, ग्रंथभेट देऊन गौरवण्यात येईल. (कै.) चंद्रकांत लक्ष्मण सावंत विशेष लेखन पुरस्कार देवगडच्या डॉ. भा. वा. आठवले यांना दिला जाणार आहे. या व कविता राजधानी पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे आहे.

गुरुवर्य अ. आ. देसाई वाङ्‌मयीन कार्यकर्ता पुरस्कार कुडाळच्या मंगेश मसगे यांना जाहीर झाला. (कै.) राजा राजवाडे वाङ्‌मयीन कार्यकर्ती पुरस्कार ठाण्याच्या मेघना साने यांना जाहीर झाला. दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार विजयदुर्ग येथील सुनंदा कांबळे यांना दिला जाईल. दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (कै.) सुलोखना मुरारी नार्वेकर लक्षवेधी नवोदित पुरस्कार ठाण्यातील आदित्य प्रवीण दवणे यांना जाहीर झाला. एक हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संमेलन सारथी पुरस्कार बोरिवलीच्या जनार्दन पाटील यांना दिला जाईल. दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे, असे नेरूरकर यांनी सांगितले.

कोकण

सावंतवाडी - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) सकाळी सोशल मिडीयावरून पसरविण्यात येणाऱ्या अंबोली घाटाबद्दलच्या अफवा...

10.57 AM

खरेदीसाठी मोठी गर्दी - फळबाजार तेजीत; हॉटेल फुल्ल कणकवली - गणरायांच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक...

09.57 AM

सावंतवाडी - चतुर्थी सणासाठी रेल्वे, बसेसने चाकरमान्यांनी गावाकडे येण्यास सुरवात केली आहे; मात्र खासगी बसेसकडे यंदा बऱ्याच...

09.57 AM