मुंबई गोवा महामार्गावर खड्डे, राडारोडा आणि चिखल...

road
road

पाली - मुंबई गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या ८४ किमी लांब रस्त्याच्या चौपदरिकणाचे काम मागील सहा वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. या मार्गावर बहुतांश ठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. तसेच बारीक खडी, दगड आणि चिखल देखिल रस्त्यावर आला आहे. परिणामी वाहतूकिवर याचा विपरीत परिणाम होईन परिवहन मंडळाच्या गाड्यांना देखिल उशिर होत आहे.

रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. खड्डे, चिखल व राडारोड्यामुळे वाहनचालक, प्रवासी व पर्यटकांची गैरसोय होत आहे. मागील अनेक वर्षांपासून सकाळने महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात लक्ष वेधले आहे.सध्या काही ठिकाणी रस्त्यावरील खड्डे अर्धा फुटापेक्षाही जास्त खोल आहेत. कामाचा निकृष्ठ दर्जा, अवजड वाहतूक आणि मुसळधार पावसात या मार्गाचा टिकाव लागत नाही.

वाहतूक कोंडी
या मार्गावरुन अनेक वाहने ये-जा करतात. खड्डे अाणि राड्यारोड्यामुळे वाहतुक कोंडीला आमंत्रण मिळते.त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण येतो. वाहतुक कोंडी सुरळीत करतांना वाहतुक पोलिसांच्या नाकीनऊ येते. 

अपघातांना आमंत्रण
पाऊस सतत चालू राहिल्याने रस्ता दुरुस्त करण्यास अडचणी निर्माण होतात. खड्डे भरण्यासाठी ठोस उपाययोजना न करता दगड, खडी,मातीचा वापर केल्याने परत खड्डे पडून रस्त्याची अधिक दुरवस्था होते. तसेच खड्डे अधिक विस्तृत होऊन पावसाच्या रस्त्यावर अधिक चिखल होतो. काही वेळेस हे मिश्रण रस्याच्या समतल टाकेले जात नाही तेथे उंच-सखल भाग तयार होतो. परिणामी वाहने आदळत जातात. महामार्गावरील खड्डे, राडारोडा आणि चिखलातून मार्ग काढतांना वाहनचालकांची कसरत होते. खड्डयांतून बाहेर आलेली बारीक खडी व चिखलामुळे हमखास आपटून व घसरुन दुचाकीस्वार कोसळत आहेत. तसेच खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा मोठ्या वाहनांचे सुद्धा अपघात होतात. तसेच रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवितांना अडथळा येतो. 

बाजूपट्टी धोकदादायक
महामार्गावर अनेक ठिकाणी पक्की बाजू पट्टीच नाही अाहे. अनेक ठिकाणी बाजू पट्टिवर खड्डे पडेल अाहेत चिखल झाला आहे. तर काही ठिकाणी गवत उगवले आहे. यामुळे महामार्गावर वाहनचालकांना गाडी रस्त्याच्या शेजारी नेतांना अडचण येते. बर्याच वेळा ओव्हरटेक करतांना या बाजू पट्टीवर फसुन वाहने कलंडून अपघात होतो. महामार्गावर अनेक ठिकाणी दुपदरीकरण करण्यासाठी रस्ता दुभागण्यात आला आहे. ज्या ज्या ठिकाणी अशाप्रकारे रस्ता दुभागण्यात आला आहे तेथे खड्डे पडले आहेत.तेथील खडी व डांबर निघाले आहे.

परिवहन मंडळाच्या गाड्या उशिराने
महामार्गावरील अशा विविध काराणांमुळेपरिवहन मंडळाच्या गाड्या व प्रवाशी वाहनांचा अधिक वेळ जातो. परिणामी प्रवाशी, नोकरदार आणि विदयार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. एका परिवहन मंडळाच्या कर्मचार्याने सकाळला सांगितले की महामार्गाच्या दुरावस्थेमुळे निच्छित ठिकाणी न पोहचल्याने कामाच्या वेळेत देखिल वाढ होते परिणामी खुप गैरसोय होत आहे.

कामानिमित्त या महामार्गावरुन रोज प्रवास करतो. रस्त्याची पुरती वाईट अवस्था झाली आहे. यामुळे वेळेवर बस आणि वाहने देखिल मिळत नाही. परिणामी कामाच्या ठिकाणी व घरी पोहचण्यास उशिर होतो. तसेच हा प्रवास असुरक्षित झाला आहे. रस्त्याचे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे.
सुहास पाटील, प्रवासी, पेण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com