खोपोलीतील नागरिकांकडून चोरट्यांची धुलाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

खोपोली - येथील मस्को कॉलनीत संशयास्पद हालचाली दिसल्याने सुरक्षारक्षकाने हटकताच त्याच्यावरच पाच जणांनी हल्ला केला. सुरक्षारक्षकाच्या आवाजाने तेथे आलेले रहिवासी आणि अन्य सुरक्षारक्षकांनी त्या चोरट्यांची धुलाई केली. या झटापटीत दोघांनी पळ काढला. सापडलेल्या राजन बबन काळे (35), सुरेश भाऊ शिंदे (40), बलभीम उमराव शिंदे (44) या तिघांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, त्यांच्यावर नगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून खोपोली व परिसरात दिवसा व रात्री बंद घरांची कुलपे तोडून होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे पाच जणही मस्को कॉलनीत याच उद्देशाने आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाचही संशयितांविरुद्ध खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व जण उस्मानाबाद जिल्ह्यातील वाकळी (ता. कळंब) गावचे रहिवासी आहेत. बळिराम छगन काळे आणि आणखी एक जण फरार आहे. पोलिसांच्या ताब्यातील तिघांच्या चौकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.