द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

सात प्रवासी गंभीर जखमी
खोपोली - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ चार वाहने एकत्र धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना कळंबोली येथील "एमजीएम' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास खासगी प्रवासी बस व तीन मोटारी एकाच वेळी धडकल्या. अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून, दोन मोटारींचे मोठे नुकसान झाले. जखमींमधील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

खोपोली : द्रुतगती महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात मोटारीची झालेली स्थिती.