खालापूर तालुक्‍यातील धरणे तुडुंब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

खोपोली - रायगड जिल्ह्यात आठ-दहा दिवसांत झालेल्या दमदार पावसाने धरणे, पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. खालापूर तालुक्‍यातील डोणवत, भिलवले, कलोते-मोकाशी ही धरणे ओसंडून वाहत आहेत. आत्करगाव, नढाळ, उसरोली व अन्य पाझर तलावही भरले आहेत.

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण मात्र अजूनही भरलेले नाही. या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. लवकरच हे धरणही ओसंडून वाहण्याची चिन्हे आहेत. रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत 28 धरणे आहेत. अनेक पाझर तलावही आहेत. खालापूर तालुक्‍यात मोरबे हे मोठे धरण आहे. जलसंपदा विभागाकडून नवी मुंबई महापालिकेने हे धरण घेतले आहे.

खालापूर तालुक्‍यात काही दिवसांत सरासरी 979.3 मिलिमीटर पाऊस पडला आहे.