मुंबई-गोवा मार्गावर बसला अपघात; 26 जखमी

अमोल टेंबकर
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

खारेपाटण मध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. शनिवारी रामेश्वर ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले होते. त्यामुळे बस प्रवाशांमध्ये खबराट पसरली आहे.

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-संभाजी नगर येथे विशाल ट्रॅव्हल्स या खासगी बसला अपघात झाला. आज (रविवार) सकाळी सहाच्या दरम्यान झालेल्या अपघातात बसमधील २६ प्रवासी जखमी झाले आहेत.

खारेपाटण मध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला. शनिवारी रामेश्वर ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले होते. त्यामुळे बस प्रवाशांमध्ये खबराट पसरली आहे.

परेल-मुंबई येथून ही बस सावंतवाडी-बांदा येथे चाललेली होती. खारेपाटन प्रा. आ. केंद्रात जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. गंभीर ७ जखमी प्रवाशांना कणकवली येथील ग्रामीण रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.