आंबोली घाट सुरक्षित; घाट बंद असल्याची अफवा

अमोल टेंबकर
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

आंबोली घाटात सहा वर्षांपूर्वी मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक काही दिवस बंद होती. हा घाट संस्थानकालीन आहे. इंग्रजांच्या काळात तो बांधला गेला आहे. आता गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप ग्रुपवर अंबोली घाटात दरड कोसळली, घाट बंद आहे, पोलिस बंदोबस्त आहे असे मॅसेज फिरत आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते.

सावंतवाडी - गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) सकाळी सोशल मिडीयावरून पसरविण्यात येणाऱ्या अंबोली घाटाबद्दलच्या अफवा असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुरेश बच्चे यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी आंबोली घाट सुरक्षित असल्याचेही म्हटले आहे.

आंबोली घाटात सहा वर्षांपूर्वी मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक काही दिवस बंद होती. हा घाट संस्थानकालीन आहे. इंग्रजांच्या काळात तो बांधला गेला आहे. आता गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅप ग्रुपवर अंबोली घाटात दरड कोसळली, घाट बंद आहे, पोलिस बंदोबस्त आहे असे मॅसेज फिरत आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. कोल्हापूरवरून कोकणात येणारे अनेक नागरिक आंबोली घाटाचा वापर करतात. पावसाळ्यात या घाटात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.

याविषयी माहिती देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे यांनी सांगितले, की आंबोली घाट रस्ता सुरक्षित आहे. काही लोकांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी या रस्त्यावरून यावे. असा कोणताही प्रकार घडलेला नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: