रायगडावरील टकमक टोकावरुन तरूण-तरुणी कोसळले दरीत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पाटील, पोलिस नाईक आशुतोष म्हात्रे, सावंत व अन्य कर्मचारी तसेच महाडमधील ट्रेकर्स किल्ले रायगडावर दाखल झाले आहेत. या दोघांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.

महाड - रायगडवरील टकमक टोकावरून एक तरुण आणि त्याची भावी पत्नी खोल दरीत कोसळण्याची घटना 26 ऑगस्टला दुपारी घडली. स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचे काम महाड तालुका पोलिसांनी सुरू केले आहे. या दोघांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

लता रामा मुकणे (रा. कुंभार्डे आदिवासी वाडी, महाड) आणि सोनू (पूर्ण नाव माहित नाही रा. कासेवाडी आदिवासी वाडी, ता. माणगांव) असे या भावी दांपत्याचे नाव आहे. लताचा चुलत भाऊ आणि सोनूचा मित्र राहूल सुरेश मुकणे (रा. कुंभार्डे आदिवासी वाडी, महाड) याच्यासह रायगडावर फिरायला आले होते. टकमक टोकावर लता आणि सोनू या दोघांनी राहुलला मोबाईलवर फोटो काढायला सांगितले. राहूल फोटो काढत असतानाच हे दोघे दरीत कोसळले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.