सावंतवाडी: रेल्वे प्रवासी आणि पोलिसांत धक्काबुक्की

अमोल टेंबकर
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मळगाव पोलिस व आरसीएफ जवानांना प्रवाशांकडून धक्काबुक्की करण्यात आली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने प्रवाशांकडून घोषणा देण्यात आल्या. या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सावंतवाडी : सावंतवाडीहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आज (शनिवार) सकाळी प्रवाशी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडीहून मुंबईकडे जाणारी लोकमान्य टिळक एक्स्प्रेस तब्बल 16 तासानंतर सुध्दा न आल्याने चाकरमानी आणी पोलिस यांच्यात धक्काबुक्की झाली. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली.

मळगाव पोलिस व आरसीएफ जवानांना प्रवाशांकडून धक्काबुक्की करण्यात आली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने प्रवाशांकडून घोषणा देण्यात आल्या. या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्या उशीराने धावत आहेत. आणखी काही गाड्यांना उशीर होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन अधिकारी मधुकर मातोंडकर यांनी केले आहे.