देवरुखात मनसैनिकांनी गणेशमूर्त्यांचे पुन्हा केले विसर्जन

प्रमोद हर्डीकर
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करा,शाडूच्या मातीच्या,कागदी लगध्याच्या गणेशमूर्ती वापरा असे वारंवार आवाहन करुनही पीओपी गणेशमूर्ती आणण्यात भाविक धन्यता मानतात.या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने नदीपाञात त्या तशाच पडून रहातात.या मनापासुन पुजलेल्या गणेशमूर्तींचे विटंबना होते.

साडवली : देवरुख सप्तलिंगी नदीमधील निळकंठेश्वर,तसेच रामकुंड येथेभाविकांनी मोठमोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले होते.माञ पाण्याची पातळी कमी झाल्याने या न विरघळलेल्या पीओपीच्या गणेशमूर्ती वरती दिसु लागल्या हि बाब महाराष्र्ट नवनिर्माण सेनेच्या देवरुख शहर पदाधिकार्‍यांच्या लक्षात आली.या मनसैनिकांनी स्वखर्चाने या सर्व गणेशमूर्ती पाण्याबाहेर काढुन वाहनातून नेत बावनदीतील मोठ्या पाण्यात पुन्हा विसर्जित केल्या आहेत.

पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करा,शाडूच्या मातीच्या,कागदी लगध्याच्या गणेशमूर्ती वापरा असे वारंवार आवाहन करुनही पीओपी गणेशमूर्ती आणण्यात भाविक धन्यता मानतात.या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने नदीपाञात त्या तशाच पडून रहातात.या मनापासुन पुजलेल्या गणेशमूर्तींचे विटंबना होते.

देवरुख शहरातील भाविकांनी गणेशविसर्जन केलेल्या निळकंठेश्वर नदी घाट तसेच रामकुंड गणेशघाटाजवळील पाण्याची पातळी कमी झाल्याने या सर्व मोठ्या मूर्ती पाण्याबाहेर पडलेल्या अवस्थेत मनसे पदाधिकार्‍यांना दिसून आल्या.

देवरुख मनसे शहर प्रमुख अनुराग कोचिरकर व पदाधिकारी,कार्यकर्तेयांनी एकञ येत स्वखर्चाने चारचाकी वाहने आणून या मोठ्या गणेशमूर्ती ६की.मी.दूर असलेल्या व पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असलेल्या बावनदी पाञात नेवून पुन्हा त्या विसर्जित करुन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.

आपण श्रध्देने गणेशोत्सव साजरा करतो माञ गणरायांची मूर्ती विसर्जन केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतो व याच मूर्तींची पाण्याबाहेर पडून विटंबना होते ही बाब आपण लक्षातच घेत नाही.

टॅग्स