अभियंता तरुणाचे रांगोळीतून अप्रतिम कलाकृती दर्शन

art
art

पाली : रांगोळीची कला अधिक लोकांपर्यत पोहचावी अाणि त्यांना रांगोळी शिकता यावी याचा ध्यास एका तरुणाने घेतला अाहे. अापल्या अप्रतिम कलेच्या माध्यमातून ग्रामिण भागातील रोहन डंगर हा अभियंता तरुण रांगोळी कलेचा प्रसार व प्रचार करत आहे. पेण तालुक्यातील दुरशेत येथे शुक्रवारी (ता.२०)अायोजित रांगोळी महोत्सवात त्याने बाहुबली अाणि एैश्वर्या राॅयची हुबेहूब रेखाटलेल्या रांगोळीने सर्वांनाच थक्क केले.

रोहन डंगर (वय.२४) हा इंजिनियरिंगची पदवी घेतलेला तरुण मुळचा पेण तालुक्यातील दुरशेत गावचा रहिवाशी अाहे. सध्या तो कर्जत येथे वास्तव्यास असुन रसायनी येथील रिलायंस कंपनीत कामाला आहे. लहानपणी पासूनच रांगोळीचे अाकर्षण होते. सोबतच चित्रकलेचीही अावड होती. नकळत्या वयात थरथरत्या हाताने रांगोळी काढण्याचा सराव सुरु केला. काही कालावधीतच रांगोळीवर अाणि रंगसंगीवर सराईत हात बसला. यासाठी त्याच्या आई वडिलांनी प्रेरणा देवून मार्गदर्शन केले. हि कला अनेकांनी शिकावी व अधिक लोकांपर्यत पोहचून त्यांना रांगोळी काढता यावी यासाठी रोहन प्रयत्न करतो आहे. शाळा, महाविदयालये, विविध कार्यक्रम, स्पर्धा,महोत्सव अशा ठिकाणी स्वयंस्फुर्तीने जावून तेथे रांगोळी काढतो आहे. गावातील अनेक मुलांना रांगोळी काढण्याचे मोफत प्रशिक्षण देत आहे. त्याचा अनेक ठिकाणी सत्कार व गौरव करण्यात आला अाहे.

प्रतिसाद सामाजिक उपक्रमाच्या वतीने बलीप्रतिपदा आणि पाडव्याच्या मुहूर्तावर दुरशेत येथे शुक्रवारी (ता.२०) रांगोळी महोत्सव संपन्न झाला. गावातील होतकरु कलावंतांना आपली कला सादर करता यावी या उद्देशाने हा महोत्सव अायोजित केला जातो. सर्वसामान्यांची कला लोकांपर्यंत पोहचावी आणि यातूनच एखादा कलावंत तयार व्हावा या हेतुने अनेक वर्षापासून हा महोत्सव भरविण्यात येत आहे. या महोत्सवात गावातील बहुसंख्य महिला पुरुष तसेच बाल कलाकार यांनी मोठ्या संखेने सहभागी होऊन आपली कला सादर केली. काहींनी रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखिल दिला होता. सायंकाळी हा महोत्सव सर्वांसाठी खुला करण्यात आले. सुंदर कलाकृती म्हणून दीपाली गावंड, हर्षदा डंगर, हर्षद गावंड तसेच लहान मुलांमध्ये रोहन गावंड,पूर्वा गावंड, रूपाली गावंड यांची निवड करण्यात आली.त्यांना प्रभाकर गणपत गावंड तसेच श्री संदीप प्रभाकर म्हात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या महोत्सवाचे खास आकर्षण होते दुरशेत गावचे सुपूत्र रोहन सुनील डंगर यांची उपस्थिती. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रोहन डंगर यांनी आपली कला सादर केली. त्यांनी बाहुबली अाणि एैश्वर्या राॅय यांचे रेखाटलेली सुंदर रांगोळी या महोत्सवात सर्वांचे खास आकर्षण ठरली.

आपल्या कलाकृती मधून लोकांना आनंद घेता यावा हाच निर्मळ उद्देश मनाशी ठेऊन आपली कला जोपासत आहे.लहान वयात चित्रकलेची आवड़ होती. रांगोळी व चित्रकेलची अावड जोपासण्यासाठी आई वडिलांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली. या दोन्ही कला सर्वांपर्यत पोहचाव्यात व अनेकांना शिकता याव्यात यासाठी माझ्या परिने प्रयत्न करत आहे.
- रोहन सुनील डंगर, अभियंता व कलाकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com