महाड: शिरवली शाळेची इमारत कोसळली, जिवीतहानी टळली

सुनील पाटकर
रविवार, 23 जुलै 2017

महाडपासून 17 कि.मी अंतरावर असलेल्या शिरवली या गावात 2001 साली 1 ली ते 4 थी साठी सुमारे 4 लाख रुपये इमारत बांधण्यात आली. एक वर्षातच या इमारतींच्या भिंतींना माठे तडे गेले होते. ही बाब ग्रामस्थांनी सदर ठेकेदार आणि शिक्षण विभाच्या निदर्शनास आणून दिली असता कोणती कारवाई करण्यात आली नाही.

महाड : निकृष्ट बांधकामामूळे व त्यातच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील
शिरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत रात्री कोसळली. इमारत
रात्री कोसळल्याने सुदैवाने जिवीत हानी टळली आहे.

या प्रकरणी सभापती सिताराम कदम यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन पंचनामा
करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार
शिक्षण मिळावे यासाठी 'सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपयांच्या
शाळा इमारती बाधल्या गेल्या आहेत. यावर योग्य नियंत्रण नसल्याने व कामे
स्थानिक अकुशल ठेकेदारांनी हि बांधकामे केल्याने तालुक्यातील अनेक
शाळांच्या इमारती गळत आहेत, या धोकादायक इमारतींमध्ये ग्रामीण भागातील
विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

महाडपासून 17 कि.मी अंतरावर असलेल्या शिरवली या गावात 2001 साली 1 ली ते 4 थी साठी सुमारे 4 लाख रुपये इमारत बांधण्यात आली. एक वर्षातच या इमारतींच्या भिंतींना माठे तडे गेले होते. ही बाब ग्रामस्थांनी सदर ठेकेदार आणि शिक्षण विभाच्या निदर्शनास आणून दिली असता कोणती कारवाई करण्यात आली नाही. अखेर  शुक्रवारी 21 जुलैला रात्री शाळेची इमारत कोसळली.

ही घटना ग्रामस्थांनच्या लक्षात येताच शाळेच्या छताला लाकडी खांबाचा आधार देण्यात आला आहे. शाळेची पट संख्या कमी असल्याने येथील मुलांना अन्य इमारतीच्या एका वर्गात बसविण्यात येत होते त्यातच ही घटना रात्री घडल्यामुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. या घटनेची माहीती मिळताच महाVड पंचायतीचे सभापती सिताराम कदम आणि माजी जिल्हापरिषद सदस्य निलेश ताठरे यांनी तातडीने पहाणी करुन, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या कडुन पंचनामा करुन घेतला आहे. या इमारती शेजारी असलेल्या अन्य इमारतीचा देखिल पाया धोकादायक झाल्याने विद्यार्थांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :