आंबोलीतील ते 'स्टॉल' रातोरात पाडले

Amboli
Amboli

सावंतवाडी : आंबोली धबधबा परिसरातील अनधिकृत स्टॉल तोडण्याचा इशारा  दिल्यानंतर अवघ्या काही तासात  वनविभागाकडून ते स्टाॅल  तोडून टाकण्यात आले
 ही कारवाई आज रात्री  अकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली वनविभागाकडून करण्यात आली. बाबत स्थानिक व्यावसायिक मात्र अनभिज्ञ होते. त्यामुळे उद्या व्यावसायिक आणि वनविभाग यांच्यात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

आंबोली धबधबा परिसरात चौकुळ व आंबोली गावातील स्थानिक लोकांकडून स्टाॅल  उभारण्यात आले होते. गेली दहा ते पंधरा वर्षे त्याठिकाणी स्थानिक रोजगार करीत आहेत. दरम्यान आंबोली येथील केशव जाधव नामक ग्रामस्थाने आपल्याला त्याठिकाणी अधिकृत परवानगी द्या अशी मागणी करीत आज उपोषण केल्यामुळे त्या वादात वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या ठिणगी पडली. यावेळी सहायक उपवनसंरक्षक सुभाष पुराणिक यांनी ते स्टॉल काढून टाकण्यात येणार आहेत असा इशारा दिला होता.  या गोष्टीला अवघे काही तास उलटण्या अगोदरच वनविभागाने कारवाई केली.

काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने धबधबा परिसरात असलेले स्टॉल काढून टाकण्यात आले. याची माहिती सावंतवाडीतील युवक सोहेल बेग यांनी दिली. याबाबत पुराणिक  यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले संबधित स्टाॅल  बेकायदेशीर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार होती यापूर्वी संबंधितांना कल्पना देण्यात आली होती. आपण सद्यस्थितीत बाहेर आहे आंबोली वनपरिक्षेत्रा कडून ही कारवाई करण्यात आली असावी असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com