सावंतवाडीत आढळला मांजऱ्या जातीचा साप

अमोल टेंबकर
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

कोलगाव हायस्कूलमध्ये भर वर्गात विद्यार्थी असताना या सापाने आपली हजेरी लावल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली. सर्पमित्र राजन निब्रे यांच्या सहाय्याने त्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

सावंतवाडी : येथील कोलगाव हायस्कूलमध्ये मांजऱ्या जातीचा साप आढळून आला. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

कोलगाव हायस्कूलमध्ये भर वर्गात विद्यार्थी असताना या सापाने आपली हजेरी लावल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली. सर्पमित्र राजन निब्रे यांच्या सहाय्याने त्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

सापाची ही जात दुर्मिळ आहे, असे वनविभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक यांचे म्हणणे आहे. याबाबतची माहिती प्रकारची माहिती प्रशालेचे शिक्षक रामचंद्र मेस्त्री यांनी दिली.

टॅग्स