देवरुख एसटी आगारातून गाड्या मार्गस्थ

ST bus
ST bus

साडवली : वेतन आयोग व इतर विविध मांगण्यांसाठी ऐन दिवाळीत पुकारलेला एसटी कामगारांचा संप अखेर मागे घेण्यात आला. चार दिवसांनी देवरुख आगारातील गाड्या सकाळी ७ वाजल्यापासून रस्त्यावर धावू लागल्या.

भाऊबीजेच्या दिवशी तरी एसटी धावली म्हणून प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. एसटी कामगार संघटना,इंटक संघटना देवरुख आगारातील संपात सहभागी होती. साखरपा संगमेश्वर माखजन हे विभाग देवरुख आगाराच्या अख्यारीत येतात. संप केल्याने व तो चार दिवस चालल्याने ग्रामीण भागातील सगळे व्यवहार ठप्प झाले होते. ऐन दिवाळीत हा संप झाल्याने ग्राहकच देवरुख संगमेश्वर साखरपा या प्रमुख बाजारपेठेत न आल्याने याचा व्यापारीवर्गाला मोठा फटका बसला.कापड फटाका किराणा व्यापारावर मोठा परिणाम झाला.

प्रवाशी वर्गालाही मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक भुर्दंड जास्त झाला. अनेक प्रवाशांचे अतोनात हाल झाले. देवरुख आगारातील संपाला शिवसेना, जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठींबा दिला. आमदार सदानंद चव्हाण, जनता दल जिल्हाध्यक्ष युयुत्सु आर्ते, काँग्रेस जिल्हा प्रवक्ते अशोकराव जाधव, राष्ट्रवादीचे बापू शेट्ये, हनिफ हरचिरकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमोद पवार, प्रथमेश कुलकर्णी, नगरसेवक नंदादिप बोरुकर, प. स. सदस्य छोट्या गवाणकर, ईस्तियाक कापडी यांनी कामगारांच्या लढ्याला बळ दिले. प्रवाशांनीही एसटी कामगारांची होणारी पिळवणूक जाणून स्वतः ञास सहन करुन कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

देवरुख पोलिस स्थानकाचे निरिक्षक पाटील यांनी देवरुख आगार व प्रमुख मार्गावर चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले. संपात सहकार्य करणार्‍या सर्वांचे देवरुख आगार कामगार संघटने तर्फे विलास जाधव,चंदन कदम, सोनवडेकर, संदेश रेडीज  व कार्यकारीणीने आभार मानले आहेत.आगार व्यवस्थापक शशिकांत मोहितू यांनी संप काळात महामंडळाला अपेक्षीत काम केले. चार दिवसांनी एसटी अखेर धावल्याने प्रवाशांसह व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com