करवत रे करवत आणि भगवती देवीची होळी आली रे मिरवत होलीss ओ

रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे.
kokan holi
kokan holisakal

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीचा उत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. देवाचा अंश म्हणून कुमार मुलाला देवीच्या वेशामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवले जाते. आज दुपारी जोशी पाळंद येथे वाघधरे यांच्या आवारातील आंब्याची होळी विधीवत पूजा केल्यानंतर तोडण्यात आली. त्यानंतर ही होळी नाचवत नेण्यात आली. ही शेकडो वर्षांची परंपरा आजही जपण्यात येत आहे. यावेळी भाविकांचा उदंड उत्साह पाहायला मिळाला.

Holi
HoliSakal

कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे. देवाला रुपं लागल्यानंतर ग्रामदेवतेच्या पालख्या सजवण्यात येऊ लागल्या. त्यानंतर आज होळी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक गावामध्ये मोठे होम करण्यात येत आहे. दरम्यान, श्री भगवती देवीची आंब्याची होळी नाचवण्याची प्रथा याही वर्षी जपण्यात आली. दोन्ही बाजूला असलेल्या होळकऱ्यांनी आंब्याची सुमारे पन्नास फूट उंचीची होळी हवेत उडवली. प्रत्येक नाक्यावर अशी होळी उडवत होळकऱ्यांनी आपले कसब आणि किल्लावासियांनी एकी दाखवली. पालखीऐवजी होळी नाचवण्याची ही आगळीवेगळी प्रथा आहे.

Holi
HoliSakal
kokan holi
पिंपरी : पदपथ, सायकल ट्रॅकवर पार्किंग केलेल्या वाहनांवर होणार कारवाई

होळी पौर्णिमेला भगवती देवीच्या शिमगोत्सवासाठी कुमार मुलगा देवीला अर्पण केले जाते. त्यासाठी या मुलाला देवीच्या वेशात सजवून त्याला वस्त्रालंकार परिधान केले. त्यानंतर मानकरी देवीच्या मंदिरातून ढोल-ताशा, नगार्‍यांच्या गजरात मुलाला घेऊन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी जोशी पाळंद येथे वाघधरे कंपाउंड येथे आंब्याच्या होळीची पूजा बांधकाम व्यावसायिक श्री. व सौ. वाघधरे यांनी केली. या वेळी सर्व मानकरी उपस्थित होते.

हुरा रे हुरा, आमच्या भगवती देवीचा सोन्याचा तुरा रे होलिओऽऽ, करवत रे करवत, भगवती देवीची होळी चालली मिरवत रे होलिओऽऽ अशा फाका घालून आंब्याची होळी नाचवण्यास सुरवात झाली. होळी ज्या ज्या ठिकाणी जाते तिथे देवीच्या रुपातील मुलाचीही पूजा करण्याची प्रथा आहे. अब्दागिर, निशाण, मानकरी यांचा मिरवणुकीत सहभाग होता. या शिमगोत्सवासाठी मुंबईचे चाकरमानी, परदेशी नोकरी-धंद्यासाठी असणारे रत्नागिरीकर आवर्जून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com