महाराष्ट्राला कृषी पर्यटनासाठी मोठा वाव - विजय सरदेसाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

वेंगुर्ले - महाराष्ट्राला कृषी पर्यटनासाठी मोठा वाव असून गोवा व महाराष्ट्राने एकत्रित येऊन कृषी पर्यटन क्षेत्रात विकास करावा, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे माजी विद्यार्थी तथा गोव्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी वेंगुर्ले येथे केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील मिळालेल्या उत्तम दर्जाच्या ज्ञानावर आज मी कृषी मंत्री झालो. तसेच त्या ज्ञानाचा उपयोग सध्या मी माझ्या शेतीमध्येही करीत आहे. कृषी पर्यटन विकसित करण्यासाठी गोव्याचे कायमच सहकार्य राहील

- विजय सरदेसाई,  कृषी मंत्री, गोवा

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लीनरी सोसायटी फॉर अॅडव्हॉन्मेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्यावतीने वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे आजपासून (८ मे) आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेला सुरुवात झाली असून यामध्ये विदेशातील ४० तर देशातील २७२ असे मिळून एकूण ३१२ शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.

परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य, माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. शंकरराव मगर, डॉ. किसन लवांदे, प्रमुख वक्ते डॉ. व्हीक्टर गॅलन, कृषी संशोधन स्पेनच्या प्रा.कॅनरी आयलँड, रिलायन्स ग्रुपचे माजी उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र गुंजाटे, डॉ. ए. के.सिंग, चार्ल्स डार्विंग युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाचे डॉ. पिंग लू, वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रदिप हळदवणेकर आदी उपस्थित होते. गोवा राज्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांचा डॉ. व्हीक्टर गॅलन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

परिषदेच्या आज पहिल्या दिवशी जागतिक पातळीवर आंब्याची सद्यस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशीकता आणि प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्त्रोत व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र झाले. ९ मे रोजी शाश्वत उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण तसेच यावेळी कृषिवर आधारित विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. ही परिषद ११ मे पर्यंत चालणार असून विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. 

Web Title: Kolhapur News Vengurle International Mango conference