भक्ष्याच्या शोधातील बिबट्याचीच झाली शिकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

वेंगुर्ले - दाभोली-नागडेवाडी येथे कुत्र्याचा पाठलाग करणाऱ्या बिबट्याचा व कुत्र्याचा वीस फूट खोल पाणी असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांनी मृत बिबट्या व कुत्र्याला बाहेर काढले.

दाभोली-नागडेवाडी येथील दादा पेडणेकर यांना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा कुत्रा जोरजोरात भुंकताना ऐकू आले. त्यावेळी ते बाहेर आले तर त्यांच्या कुत्र्याची बिबट्याने पाठ धरली असल्याचे निदर्शनास आले. कुत्रा पळताना खोल विहिरीत पडला. त्यापाठोपाठ बिबट्याही विहिरीत पडला. 

घटनेची कल्पना पेडणेकर यांनी पोलिसपाटील जनार्दन पेडणेकर यांना दिली. त्यांनी तातडीने वनविभागाला कळविले. त्यानुसार सकाळी ८ वाजता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत पडलेला बिबट्या व कुत्रा हा खोल विहिरीमध्ये असलेल्या वीस फूट पाण्याच्या तळाला गेले होते. अखेर तेथील ग्रामस्थ प्रसाद हळदणकर, प्रवीण बांदवलकर, प्रफुल्ल बांदवलकर व विठ्ठल गोवेकर यांनी पाण्यात उतरुन विहिरीच्या तळाशी असलेल्या मृत बिबट्याला व कुत्र्याला ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढले. वनविभागाने त्याचा पंचनामा करुन बिबट्याला ताब्यात घेतले.