सावंतवाडीत भरवस्तीत सापडला अजगर (व्हिडिओ)

अमोल टेंबकर
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

अजगराला शिताफीने पकडून अखेर नैसगिक अधिवासात सोडून दिले.

सावंतवाडी : सावंतवाडीमध्ये भरवस्तीत अजगर सापडला आहे. पाच फूट लांबीचा हा अजगर असून, सर्पमित्राच्या साह्याने त्याला पकडून त्याचा अधिवास असलेल्या ठिकाणी सोडून देण्यात आले. 

खासकीलवाडा भागात काल (गुरुवार) ही घटना घडली. अजगर दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्यावर तुषार विचारे या प्राणीमित्रास बोलावण्यात आल्यावर त्याने अजगराला शिताफीने पकडून अखेर नैसगिक अधिवासात सोडून दिले. यावेळी सामाजिक युवा कार्यकर्ते अमेय तेंडोलकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: konkan marathi news savantwadi python captured