कृषी विद्यापीठात राशीनुसार रोपलागवड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

दाभोळ - महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत व कृषी दिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या हस्ते वृषभ राशीच्या सप्तपर्णी झाडाची लागवड करून या मोहिमेचा आरंभ करण्यात आला.

या वेळी डॉ. भट्टाचार्य यांच्या पत्नी आणि कन्या यांनीही आंबा व पिंपळ रोपाची लागवड केली. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, शिक्षण संचालक डॉ. रमेश बुरटे यांच्या हस्ते फणस व बकुळ रोपांची लागवड करण्यात आली. प्रभारी कुलसचिव डॉ. सतीश नारखेडे, प्रभारी नियंत्रक अनिल पवार, डॉ. दिलीप महाले, कुलगुरूंचे स्वीय सहायक सुनील दुसाने यांनी पाडळ रोपांची लागवड केली. 

कृषी महाविद्यालय दापोलीचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद नरंगळकर, विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. प्रमोद सावंत, डॉ. बी. जी. देसाई, डॉ. दीपक हर्डीकर, डॉ. विजय पाटील, कर्लेकर यांनी अनुक्रमे शिसम, फणस, वड, रक्‍तचंदन, पळस आणि वडाच्या रोपांची लागवड केली. वनाधिकारी सुरेश वरक आणि वनरक्षक अमित निंबकर यांनी शमी आणि सप्तपर्णी रोपांची लागवड केली. 

सप्ताहात विद्यापीठ मुख्यालय, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली, सर्व संशोधन केंद्रे, महाविदयालये, कृषी विज्ञान केंद्रे येथे सुमारे १४ हजार ५२२ रोपे लावण्याचे लक्ष्य निश्‍चित करण्यात आले आहे. या वेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपले राशीप्रमाणे रोपांची लागवड यावेळी केली.

टॅग्स