आंबा घाटासह गुहागर मार्गावर झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

रत्नागिरी - विश्रांती घेत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. लावणीच्या कामांना वेग आला आहे. रत्नागिरीत आज दिवसभर संततधार सुुरू होती. आंबा घाटात महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक दोन तास ठप्प होती. गुहागर-आबलोली रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद होती.

आंबा घाटात सकाळी ९.१० वाजता रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक बंद झाली. झाड काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले होते. सुमारे तीन तास वाहतूक ठप्प होती.

पावसामुळे मंडणगडला नरेश विष्णू यादव यांच्या घरावर झाड पडून ४,४०० रुपयांचे नुकसान झाले. दापोलीत दाभोळला आनंदी गोपाळ महादेव यांच्या घराचे ४५००, परेश गुजराथींच्या घराचे २ हजार, नवानगरच्या संतोष धनावडेंच्या गोठ्याचे १० हजार, जिमवाडीत रस्त्यावर वडाचे झाड पडल्याने वाहतूक बंद झाली आहे. चिपळूण टेरव येथे सौ. निर्मला तुकाराम जाधव यांच्या घर पडले आहे. शिरगाव येथील सतीश चव्हाण यांच्या घरावर झाड पडल्याने ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

राजापूर येथे टेंपोवर वडाचे झाड कोसळून एकजण जखमी झाला. नागोदा शामराव बुक्‍कम असे त्याचे नाव आहे. चिखलगाव येथे लाकडाच्या खोपीवर झाड कोसळले. मिठगवाणे येथे वहाळाचे पाणी घरात घुसून सुमारे ८० हजारांचे नुकसान झाले. गुहागर-आबलोली रस्त्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प होती. दापोली-पालगड येथे घरावर विद्युतखांब कोसळून घराचे नुकसान झाले. कोळकेवाडी पठारवाडीत आंब्याचे झाड कोसळल्याने सिमेंटच्या पत्र्याचे नुकसान झाले.

दमदार पाऊस
आज सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५७.०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंडणगड ४७, दापोली ४७.६०, खेड ८०.३०, गुहागर ५२, चिपळूण ८३.७०, संगमेश्वर ३७.६०, रत्नागिरी ३७.७०, लांजा ५३.००, राजापूर ७४.८० मिमीची नोंद झाली आहे.