आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित

आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित

आंबोली - येथील सगळ्यात जास्त आर्थिक उलाढाल असणाऱ्या वर्षा पर्यटनासाठी आंबोली सज्ज झाली आहे. गेले काही तास झालेल्या संततधार पावसामुळे वर्षा पर्यटनाचा मुख्य स्रोत असलेल्या आंबोलीच्या धबधब्याला पाझर फुटला आहे. येत्या रविवारपासून वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

येथे बारमाही पर्यटन असले तरी वर्षा पर्यटनाचा हंगाम सगळ्यात मोठा मानला जातो. साधारण दीड ते दोन महिने चालणाऱ्या या हंगामात हजारो पर्यटक भेट देतात. विशेषतः सुटीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. या हंगामाची आंबोलीला चाहूल लागली आहे.

येथे गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली; मात्र त्याला फारसा जोर नव्हता. काल (ता. ११) रात्रीपासून दमदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आज येथील मुख्य धबधबा प्रवाहित झाला. येत्या रविवारपासून खऱ्या अर्थाने वर्षा पर्यटनाला सुरवात होणार आहे. गेल्यावर्षी येथे साधारण १४ जूनला पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर हळूहळू पर्यटन बहरत गेले. गेल्यावर्षी वर्षा पर्यटनासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. यंदा तुलनेत वेळेवर हंगाम सुरू होत असला तरी श्रावण महिना लवकर सुरू होणार आहे. श्रावणाआधीच खऱ्या अर्थाने वर्षा पर्यटनासाठी गर्दी होते. यामुळे या हंगामाचा कमी कालावधी मिळणार असल्याने व्यावसायिकाला एकप्रकारे चिंता आहे. सुटीच्या कालावधीत होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे येथे वाहतूक कोंडी, उतिउत्साही पर्यटकांचा उपद्रव असे प्रश्‍न भेडसावतात. त्याची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. या वर्षी मुख्य धबधब्याकडे वनविभागाने आपले तीन कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त केले आहेत. सावंतवाडी पोलिस ठाण्याअंतर्गत सुटीच्या काळात जादा पोलिस कुमक ठेवण्यात येणार आहे. पार्किंगची तात्पुरती व्यवस्था करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

यंदा मुख्य धबधब्याच्या ठिकाणी रेलिंग उभारण्यात आले आहे. इतर धबधब्यांकडे मात्र फारशा नव्या सुविधा तयार केलेल्या नाहीत. असे असलेतरी हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असल्याने पर्यटन व्यावसायिकांनी तयारी पूर्ण केली आहे.

आंबोलीत पर्यटनात उन्हाळी हंगाम फ्लॉप गेला. पावसाळ्यात वर्षा पर्यटनात दर शनिवार, रविवारी गर्दी असते. यात घाटात तसेच पर्यटन स्थळांवर वाहतूक कोंडीने पर्यटकांचा हिरमोड होतो. विजेचा लपंडाव याच हंगामातच सुरू असतो. दूरध्वनी, मोबाईल सेवा ठप्प असतात. याकडे प्रशासनाने योग्य नियोजन करणे आवश्‍यक आहे.

- सुरेश चव्हाण, हॉटेल व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com