वाकणवाडीतील आदिवासींची घरे झाली प्रकाशमय

अमित गवळे
रविवार, 3 सप्टेंबर 2017

वाकणवाडी आदिवासीवाडी येथे 150 ते 200 च्या आसपास लोकवस्ती आहे. येथील आदिवासी बांधवांना शासन योजना व उपक्रमांचा लाभ मिळावा, त्यांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थर उंचावला जावा यासाठी राउत यांनी पुढाकार घेतला आहे

पाली - सुधागड तालुक्यातील आडुळसे ग्रामपंचायत हद्दीतील वाकणवाडी आदिवासी वाडीतील 14 घरे प्रकाशमय झाली आहेत. भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राउत यांनी स्वखर्चाने या घरांत विजमिटर बसवून दिले आहे.       

वाकणवाडी आदिवासीवाडी येथे 150 ते 200 च्या आसपास लोकवस्ती आहे. येथील आदिवासी बांधवांना शासन योजना व उपक्रमांचा लाभ मिळावा, त्यांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थर उंचावला जावा यासाठी राउत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी वाकणवाडी आदिवासीवाडीत आवश्यक त्या ठिकाणी विजवितरण विभागाकडून विजेचे खांब व मिटर बसवून विद्युतीकरण करुन घेतले. यासाठी विजवितरण कार्यालय पाली सुधागडचे उपअभियंता मुकेश गजभिये यांचे विशेष सहकार्य लाभले.

आदिवासींच्या घरांमध्ये पहिल्यांदाच विज आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी राजेंद्र राउत म्हणाले की सुधागड तालुका हा आदिवासी बहूल तालुका आहे. येथील दुर्गम, दुर्लक्षित भागात राहणार्‍या जनतेला प्राथमिक व मुलभूत सेवासुविधा मिळवून देण्याकरीता मागील अनेक वर्षापासून सातत्याने काम करीत आहे. यावेळी भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र राऊत यांच्यासह निखिल शहा, शरद फोंडे, कृष्णा हुले, नितेश दळवी आदिंसह वाकणवाडी येथील ग्रामस्थ उपस्थीत होते.