विकास आराखड्यासह अपूर्ण कामांचा पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

मंडणगड - नगरसेविका प्रियांका शिगवण यांची मंडणगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी आज बिनविरोध निवड झाली. मंडणगड नगरपंचायतीचा प्रस्तावित विकास आराखडा व अपूर्ण विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे. वर्षभरात शहाराचा पाणी प्रश्‍न मार्गी लावत शहर सुशोभीकरण, रस्ते व पथदीपांचा प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे नगराध्यक्ष प्रियांका शिगवण यांनी सांगितले. 

निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीच्या वतीने शिगवण यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. शनिवारी नगरपंचायतीत पीठासीन निवडणूक निर्णय अधिकारी जयराम देशपांडे, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया झाली. या वेळी नगरसेवक सुभाष सापटे, दिनेश लेंडे, आदेश मर्चंडे, राहुल कोकाटे, शांताराम भेकत, कमलेश शिगवण, मुंजीर दाभिळकर, प्रबोध कोकाटे, ॲड. सचिन बेर्डे, आरती तलार, बेबी गोरे, नेत्रा शेरे, श्रुती साळवी, श्रद्धा लेंढे, स्नेहल मांढरे, वैशाली रेगे, राष्ट्रवादीचे दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे, मनोज घागरूम, पंचायत समिती सदस्य प्रणाली चिले, अनिल रटाटे, प्रमिला शिगवण, अंजली बैकर, शुभांगी शिगवण, ऐश्वर्या रटाटे, काँग्रेसचे राजा लेंढे, संतोष मांढरे, कादीर बुरोंडकर आदी उपस्थित हेते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करून नूतन नगराध्यक्षांचे अभिनंदन केले. यानंतर प्रियांका शिगवण यांनी लगेच पदभार स्वीकारला. त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांच्या खुर्चीत विराजमान करण्यात आले.

Web Title: konkan news development plan