करमणूक विभागाला अखेरची घरघर; १ जुलैपासून बंद

राजेश शेळके 
बुधवार, 12 जुलै 2017

रत्नागिरी - वस्तू व सेवा कराच्या कक्षेमध्ये (जीएसटी) करमणूक कर आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाला घरघर लागली आहे. चित्रपट, डीटीएच, व्हिडिओ गेम, पार्लर आदी व्यवसायातून जीएसटी वसूल होणार आहे. वर्षाला ४ कोटी १० लाख एवढा महसूल हा विभाग देतो. १ जुलैपासून कर वसुली थांबविण्याचे आदेश आले आहेत. विभागाला काही कामच राहणार नसल्याने हा विभाग बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र अद्याप तसे अधिकृत आदेश नाहीत.

चित्रपटगृह, केबल ऑपरेटर, व्हिडिओ गेम पार्लर, व्हिडिओ बस आदी मनोरंजनाच्या विविध व्यवसायातून वर्षाला नियमित करमणूक कर आकारण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या स्वतंत्र करमणूक विभाग करत होता. कर बुडव्यांवर कायदेशीर कारवाई करण्यापासून ते केबल ऑपरेटर्सना परवाने देणे व इतर परवान्यांचे काम या शाखेतून केले जाते. शिवाय चित्रपटगृहांकडून दर महिन्याला तिकीट विक्रीतून कर मिळत होता. गेली वर्षी ४ कोटी १० लाख रुपये कर वसूल करण्यात आला होता. तरी जूनपर्यंत वसुली करण्यात आली आहे. १ जुलैपासून मात्र कर वसूल करू नये, असे आदेश असल्याचे करमणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  

आता झाला सेवाकर...
करमणूक कर जीएसटीअंतर्गत वसूल केले जाणार आहे. विक्रीकर विभागाला वसुलीची जबाबदारी दिली आहे. करमणूक कर विभागाला २०१७-१८ चे कर वसुलीचे उद्दिष्ट ४ कोटी १० लाख एवढे देण्यात आले. चित्रपटगृह, केबल ऑपरेटर, व्हिडिओ गेम 
पार्लर, व्हिडिओ बस आदीकडून त्याची वसुली सुरू आहे. परंतु ३० जूनपर्यंत ज्याची थकबाकी आहे, ती वसूल करण्याचे आदेश आहेत. जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर हा कर आता करमणूक कर विभागाऐवजी सेवाकर म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर आता करमणुकीपुरताही उरणार नाही.

कोकण

मंडणगड : गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या दिवसरात्र संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी...

01.15 PM

हर्णै - ‘‘ज्यावेळेस समुद्रात उडी मारली तेव्हा जगण्याची आशाच सोडली होती; पण माझ्याकडे बोया होता आणि पोहायला लागल्यावर हिंमत सोडली...

01.03 PM

रत्नागिरी -  तालुक्‍यातील झरेवाडी येथील तथाकथित पाटील स्वामींच्या बस्तानाला धक्का बसला आहे. या स्वामीविरुद्ध ग्रामीण पोलिस...

12.45 PM